कुलगुरुपदाची माळेत नागपूरकर कौस्तुभमणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

नागपूर  : राज्यातील विद्यापीठांच्या इतिहासात सर्वाधिक कुलगुरू देण्याची परंपरा डॉ. प्रमोद येवले यांनी कायम ठेवली आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मान पटकाविला आहे. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठ ते जवळपास निवड झालेल्या सर्वच विद्यापीठातील कुलगुरुपदाच्या शर्यतीत होते. नागपूर विद्यापीठातील विविध प्राधिकरणावर काम करणाऱ्या बऱ्याच नामवंत प्राध्यापकांच्या गळ्यात आतापर्यंत कुलगुरुपदाची माळ पडली आहे. यात प्रामुख्याने डॉ. राजन वेळूकर, डॉ. राजू मानकर, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. पंकज चांदे, डॉ. कृष्णकुमार, डॉ. मृणालिनी फडणवीस, डॉ.

नागपूर  : राज्यातील विद्यापीठांच्या इतिहासात सर्वाधिक कुलगुरू देण्याची परंपरा डॉ. प्रमोद येवले यांनी कायम ठेवली आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मान पटकाविला आहे. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठ ते जवळपास निवड झालेल्या सर्वच विद्यापीठातील कुलगुरुपदाच्या शर्यतीत होते. नागपूर विद्यापीठातील विविध प्राधिकरणावर काम करणाऱ्या बऱ्याच नामवंत प्राध्यापकांच्या गळ्यात आतापर्यंत कुलगुरुपदाची माळ पडली आहे. यात प्रामुख्याने डॉ. राजन वेळूकर, डॉ. राजू मानकर, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. पंकज चांदे, डॉ. कृष्णकुमार, डॉ. मृणालिनी फडणवीस, डॉ. शशी वंजारी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याच पंक्तीत डॉ. येवले यांचेही नाव जुळले आहे. यापूर्वी नागपूर, मुंबई आणि सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या शर्यतीत डॉ. येवले आघाडीवर होते. वर्धा येथील फार्मसी महाविद्यालयातून त्यांनी प्राध्यापक म्हणून सुरुवात केली. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांमध्ये त्यांनी काम केले आहे. यात व्यवस्थापन परिषद, सिनेट, विद्वत परिषदेसह विविध समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. संशोधनाचा बराच अनुभव असलेल्या डॉ. येवले यांनी आपल्या कार्यकुशलतेने विद्यापीठाची परीक्षा यंत्रणा रुळावर आणली. ऑनस्क्रीन मूल्यांकन आणि सबकुछ ऑनलाइन यातून विद्यार्थ्यांची नोंदणी ते केंद्रावर पेपर पाठविण्याचे काम ऑनलाइन पद्धतीने पाठविण्याचा यशस्वी प्रयोग केला. विशेष म्हणजे परीक्षेचे निकाल 45 दिवसांच्या आत देत, त्यांनी सर्वच विद्यापीठांना अवाक्‌ केले. याशिवाय मागील वर्षीपासून पदव्युत्तर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करून त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला टाळ्यावर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. प्रयोगशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी सातत्याने विद्यापीठाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेष म्हणजे पीएच.डी. अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करून पेट आणि पेट-1 सुरू करण्यात यश मिळविले. पीएच.डी. ऑनलाइन पोर्टल सुरू करून आरआरसीमध्ये होत असलेल्या बऱ्याच घोळ बंद करण्यात यश मिळविले आहे.
चार वर्षांत नागपूर विद्यापीठातील कामाबाबत मी समाधानी आहे. विविध प्राधिकरणात जे काम केले, त्याचेच हे फलित आहे. हे काम करताना ज्यांनी सहकार्य केले, त्यांचा मनापासून आभारी आहे.
-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Vice Chancellor of Nagpur University, Kaututhabhamani