हरभऱ्याचे क्षेत्र वाढले; अमरावती विभागात ८२ टक्के पेरणी

विभागात या पिकाची सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ९८ टक्के पेरणी झाली.
पेरणी
पेरणीफाईल

अमरावती : अमरावती विभागात रब्बी हंगामात ८२ टक्के पेरणी आटोपली. यावर्षीही हरभऱ्याचे पेरणीक्षेत्र वाढले. विभागात या पिकाची सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ९८ टक्के पेरणी झाली. तर, गव्हाची अजून निम्मी पेरणी शिल्लक आहे. सरासरी पेरणी क्षेत्राच्या ५० टक्के भागातच गहू पेरण्यात आला.

अमरावती विभागात रब्बी हंगामासाठी ६ लाख ४६ हजार ७६ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. रब्बीसाठी उपलब्ध सरासरी क्षेत्रापैकी ५ लाख ३० हजार ८९६ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. पेरणीची एकूण सरासरी ८२ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीची गती व क्षेत्र वाढले. गतवर्षी याचवेळी एकूण सरासरी पेरणी क्षेत्रापैकी ३ लाख ४० हजार ४१० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली होती. सरासरीने पेरणीचे प्रमाण ५३ टक्के होते.

पेरणी
उदगीराला होणार ९५ वे मराठी साहित्य संमेलन : साहित्यिकांचा जल्लोष

यावर्षीही विभागातील अधिकांश क्षेत्र हरभऱ्याने व्यापले आहे. हरभऱ्यासाठी विभागात ४ लाख ४९ हजार ७९६ हेक्टर क्षेत्र सरासरी असून, त्यापैकी ४ लाख ४० हजार ६ हेक्टर क्षेत्रात हरभरा पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याखाली असून ११० टक्के हरभरा पेरणी झाली. त्याखालोखाल वाशीम व बुलडाणा प्रत्येकी १०४ टक्के, यवतमाळ ८६ व अकोला जिल्ह्यात हेच प्रमाण ८४ टक्के आहे.

गव्हाची पेरणी विभागात जानेवारीपर्यंत चालत असल्याने पेरणीक्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान अमरावती विभागात गव्हासाठी १ लाख ५९ हजार ६३९ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, त्यापैकी ८० हजार ५३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पेरणीची सरासरी ५० टक्के आहे.

दोन वर्षातील तुलनात्मक पेरणी

वर्ष : हेक्टर क्षेत्र : टक्केवारी

२०२०-२१ : ३,४०,४९० : ५३

२०२१-२२ : ५,३०,८९६ : ८२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com