esakal | Vidarbha : नगरपंचायत कार्यालयात लिपिकाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

vardha

Vidarbha : नगरपंचायत कार्यालयात लिपिकाची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कारंजा (जि.वर्धा) : येथील नगरपंचायत कार्यालयात कर विभागात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या अशोक महादेव जसुतकर (वय ४५) यांनी कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केली. जुना बाजार चौक परिसरात असलेल्या इमारतीत ही घटना शनिवारी (ता. ११) सकाळी उघडकीस आली.

येथील शहरातील प्रभाग क्रमांक तीनमध्ये राहत असलेले अशोक जसुतकर हे नित्याप्रमाणे आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घरून जेवणाचा डबा घेऊन नगरपंचायतीत निघाले होते. याच काही सफाई कर्मचारी कार्यलयात गेले. यावेळी कर कार्यालयाचे दार त्यांना बाहेरून लाऊन आणि आतून बंद असल्याचे दिसून आले.

हेही वाचा: Vidarbha : जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘१०५’वरून पुन्हा वादंग

त्यांनी पाहणी केली असता ते दार आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आवाज दिला असता आतून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी आतमध्ये प्रवेश करून पाहिले असता अशोक जसुतकर यांनी आपल्या कक्षातील पंख्याच्या हुकेला गळफास घेतल्याचे दिसून आले. कार्यालयाला सलग दोन दिवसांची सुटी होती. कार्यालयाच्या चाव्या नेहमीच अशोकजवळ राहत होत्या. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजून आले नाही. त्याच्या मागे पत्नी व तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून तपास सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

चिठ्ठीचे गुढ कायम

आत्महत्या करण्यापुर्वी अशोक जसुतकर यांनी चिठ्ठी लिहुन ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला येथील ठाणेदारांनीही दुजोरा दिला आहे. मात्र, या चिठ्ठीत त्यांनी काय उल्लेख केला, काय लिहून ठेवले याची माहिती देण्यास नकार दिला. ते कर विभागात असल्याने कराच्या रकमेत काही घोळ असावा अशी चर्चा सुरू आहे.

दोराने लावला गळफास

नगरपंचायतीत असलेल्या दोराचा वापर करून या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. करविभागाच्या कार्यालयात असलेल्या छताला असलेल्या कडीला त्यांनी गळफास लावल्याचे सांगण्यात आले आहे.

loading image
go to top