विदर्भाला मिळाले आठ अप्पर जिल्हाधिकारी, सहा उपायुक्त

Vidarbha got eight upper collector
Vidarbha got eight upper collector

अमरावती : तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. यामध्ये विदर्भातील 14 जागांमध्ये आठ अप्पर जिल्हाधिकारी व सहा विभागीय उपायुक्तांचा समावेश आहे. 

राज्य सरकारने 30 जानेवारीला 61 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती दिली होती; मात्र त्यांच्या नियुक्तीचे आदेश प्रलंबित होते. दरम्यान, कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे लॉकडाउन घोषित झाल्याने या नियुक्‍त्या रखडल्या होत्या. कोरोनाच्या संकट काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने यंत्रणेवर त्याचा ताण वाढला होता. "सकाळ'ने यासंदर्भात 27 एप्रिलला वृत्त प्रकाशित करून हा मुद्दा लोक दरबारात मांडला होता. त्याची दखल घेत राज्य सरकारने 60 पैकी 35 अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली. एका अधिकाऱ्याला यापूर्वीच स्वतंत्र नियुक्ती देण्यात आली होती.

उपसचिव माधव गीर यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार नागपूर विभागात अनंत लक्ष्मण वालसकर (गडचिरोली), शिरीष प्रभाकर पांडे(नागपूर), सोनाप्पा बसवंत यमगर (अहेरी), राजेश रामराव खवले (गोंदिया), घनश्‍याम हरिभाऊ भुगावकर (भंडारा), निशिकांत अण्णासाहेब सुके (चिमूर), रेश्‍मा राजाराम वाघोले उपायुक्त पुरवठा (नागपू), राजलक्ष्मी शफिक शहा उपआयुक्त रोहयो (नागपूर), आशा अफजलखान पठाण उपायुक्त (गोसेखुर्द) तर अमरावती विभागात विजय सहदेवराव भाकरे उपायुक्त करमणूक (अमरावती), अजय प्रल्हाद लहाने उपायुक्त पुरवठा (अमरावती), धनंजय अनिल गोगटे उपआयुक्त (अमरावती), तसेच शरद पोपटराव पाटील यांना (वाशिम) तर रामदास देविदास सिद्धभट्टी यांना अमरावतीचे अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. या शिवाय उर्वरित अधिकाऱ्यांना इतर विभागात नियुक्ती देण्यात आलेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com