अप्रशिक्षितांकडून शवविच्छेदन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

इमारत आहे, तर डॉक्‍टर नाही; अनेक ठिकाणी साहित्यच नाही
अकोला - वऱ्हाडात पुरेसे शवविच्छेदनगृह असून, डॉक्‍टरांची संख्या कमी असल्याने अप्रशिक्षित सफाई कामगाराकडूनच शवविच्छेदन केले जात असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.

इमारत आहे, तर डॉक्‍टर नाही; अनेक ठिकाणी साहित्यच नाही
अकोला - वऱ्हाडात पुरेसे शवविच्छेदनगृह असून, डॉक्‍टरांची संख्या कमी असल्याने अप्रशिक्षित सफाई कामगाराकडूनच शवविच्छेदन केले जात असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.

अकोला जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृह असून, या ठिकाणी दररोज प्रत्येकी चार ते पाच मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते. परंतु, त्यासाठी उपलब्ध डॉक्‍टरांची संख्या कमी असल्याने अनेकदा नातेवाइकांना शवविच्छेदनासाठी प्रतीक्षा करावी लागते. यापेक्षा बिकट परिस्थिती वऱ्हाडात वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यात आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही व्यक्तीच्या मृतदेहाची अवहेलना होत आहे. कायद्यानुसार शवविच्छेदनासाठी एकही पैसा लागत नाही. परंतु, बहुतांश ठिकाणी शवविच्छेदन झाल्यावर त्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी पाचशे ते सहाशे रुपयांची मागणी केली जाते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवविच्छेदन गृहासाठी शासनाने सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा अहवाल लवकरच शासनाकडे पाठविण्यात येईल. शवविच्छेदन गृहात कोणी पैसे मागितल्यास तशी तक्रार करावी, त्यावर कारवाई होईल.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

बुलडाण्यात परवड
जिल्ह्यात 24 शवविच्छेदन गृहे आहेत. त्यापैकी आठ शवविच्छेदन गृहे प्रत्यक्ष कार्यरत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा व साहित्याचा तुटवडा असताना, येथे अप्रशिक्षित व्यक्तींकडून शवविच्छेदन केले जाते.

वाशीम जिल्हा
शवविच्छेदकाचे पदच मंजूर नाही. मात्र शवविच्छेदनासाठी डॉक्‍टर व कर्मचारी वर्गाची उपलब्धता असते. मात्र, डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. शववाहिकेची स्वतंत्र उपलब्धता नाही. पालिकेच्या शववाहिकेचा उपयोग होतो. वर्षाला सरासरी 250 ते 300 शवविच्छेदन होतात.

Web Title: vidarbha hospital issue doctor