अस्वलाच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी 

सचिन शिंदे
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

महादेव कुमरे (वय 52) रा. धानोरा ता. माहुर येथील शेतकऱ्याची शेतजमीन झापरवाड़ी येथे आहे. तो नेहमी प्रमाणे शेतात आला. अचानक त्याच्यावर जंगली अस्वलाने हल्ला केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला शेजारी शेतकऱ्यांनी सावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले

आर्णी : तालुक्यातील झापरवाड़ी शिवारातील शेतात ता. 9 रोजी दुपारी 12 वाजता महादेव कुमरे यांच्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. 

महादेव कुमरे (वय 52) रा. धानोरा ता. माहुर येथील शेतकऱ्याची शेतजमीन झापरवाड़ी येथे आहे. तो नेहमी प्रमाणे शेतात आला. अचानक त्याच्यावर जंगली अस्वलाने हल्ला केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला शेजारी शेतकऱ्यांनी सावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यासाठी गावातील शिवसैनिकांनी रूग्णवाहीका बोलाऊन यवतमाळ रवाना केले.  यावेळी रुग्णसेवक पराग येरावार,  नितीन शिंदे, शंकर नमूलवार, राजेश नागोशे, संतोष शिरपूरकर व समस्त शिवसैनिक हजर होते.

Web Title: vidarbha news: bear attack