बारावीतील मुला-मुलीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

लाखनी (जि. भंडारा) - एकाच वर्गात शिकणारा मुलगा आणि मुलीने पाठोपाठ मृत्यूला कवटाळले. मुलाने गळफास लावून तर मुलीने विष घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून या घटनेबद्दल विविध तर्क लावले जात आहेत.

प्रीतम अनंत बघेले (वय १८, रा. सालेभाटा) आणि वैष्णवी विनोद बुराडे (वय १८, रा. सोमलवाडा) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही लाखनी तालुक्‍यातील सावरी/मुरमाडी येथील सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयात १२ व्या वर्गात शिकत होते. गुरुवारी (ता. ११) सकाळ पाळीची शाळा सुटल्यानंतर दोघेही आपापल्या गावी गेले. घरी गेल्यानंतर प्रीतमने त्याच दिवशी दुपारी २ वाजताच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी कोणीही नसल्याने ही बाब संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (ता. १२) दुपारी वैष्णवी बुराडे हिनेसुद्धा घरी विषप्राशन केले. वैष्णवीला कुटुंबीयांनी आधी खासगी दवाखान्यात, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान वैष्णवीचा मृत्यू झाला. प्रीतमचे पितृछत्र १५ वर्षांपूर्वीच हरपले असून, तो विधवा आई, आजी व भावासह राहत होता. आत्महत्येचे कारण वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही. लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद केली.

Web Title: vidarbha news bhandara student suicide