चौदा हजार शिक्षक अतिरिक्त

राजेश सोळंकी
मंगळवार, 9 जानेवारी 2018

आर्वी, (जि. वर्धा) - राज्यातील ६१ हजारांवर जिल्हा परिषद शाळांनी संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली असून, १४ हजार ९२ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यात सर्वाधिक अतिरिक्त शिक्षकांची संख्या अमरावती जिल्ह्यात असून, सर्वांत कमी शिक्षक धुळे जिल्ह्यातील अतिरिक्त ठरले आहेत.

आर्वी, (जि. वर्धा) - राज्यातील ६१ हजारांवर जिल्हा परिषद शाळांनी संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली असून, १४ हजार ९२ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यात सर्वाधिक अतिरिक्त शिक्षकांची संख्या अमरावती जिल्ह्यात असून, सर्वांत कमी शिक्षक धुळे जिल्ह्यातील अतिरिक्त ठरले आहेत.

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ६१ हजार ६७३ जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी ६१ हजार ४९२ शाळांनी संचमान्यतेची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेअंती १४ हजार ९२ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमध्ये २ हजार ३५४ मुख्याध्यापक, ११ हजार १६५ शिक्षक, तर ५७३ पदवीधरांचा समावेश आहे. यापैकी सर्वांत जास्त एक हजार २१९ शिक्षक अमरावती जिल्ह्यात अतिरिक्त ठरले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर यवतमाळ (१ हजार १६७) आहे. त्यापाठोपाठ रायगड (१ हजार ८८) व नागपूर जिल्हा (१ हजार ४१) आहे. सर्वांत कमी शिक्षक धुळे जिल्ह्यात अतिरिक्त ठरले आहेत. येथील अतिरिक्त शिक्षकांची संख्या केवळ ५१ आहे. जालना जिल्ह्यात ६९ व भंडारा जिल्ह्यात ७९ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. वर्धा जिल्ह्यात ९२८ शाळांपैकी ९२८ शाळांनी ऑनलाइन संचमान्यता पूर्ण केली आहे. जिल्ह्यांत ३४ मुख्याध्यापक, ९७ शिक्षक, तर २५ पदवीधर असे एकूण १५६ जण अतिरिक्त ठरले आहेत.

राज्य सरकारने दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विशेष करून मराठी शाळांवर संक्रांत आली आहे. यामुळे शिक्षकही धास्तावले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात संचमान्यतेमुळे अतिरिक्त शिक्षकांची नवी समस्या उभी झाली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये व एकूणच शैक्षणिक क्षेत्रात असंतोषाचे वातावरण आहे.

जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षक
अकोला - २०८
अमरावती - १२१९
औरंगाबाद - २२३
भंडारा - ७९
बीड - २०७
बुलडाणा - ८२६
चंद्रपूर - ८६०
धुळे - ५१
गडचिरोली - ६७२
गोंदिया - ६३५
हिंगोली - ३१६
जळगाव - २४०
जालना - ६९
कोल्हापूर - २१९
लातूर - १४३
नगर - २०८
नागपूर - १०४१
नांदेड - ७७१
नंदूरबार - १०४
नाशिक - १९४
उस्मानाबाद - २१३
पालघर - २१९
परभणी - २२५
पुणे - १५५
रायगड - १०८८
रत्नागिरी - ६०७
सांगली - ११५
सातारा - १६२
सिंधुदुर्ग - ४८२
सोलापूर - १९३
ठाणे - १५५
वर्धा - १५६
वाशीम - ३०८
यवतमाळ - ११६७
...........................
एकूण - १४०९२

Web Title: vidarbha news Fourteen thousand teacher extra