‘आप’ची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नागपूर - संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. संपाचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या संपाला पाठिंबा दर्शवीत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करीत मंगळवारी (ता. सहा) कॉटन मार्केट परिसरात निदर्शने केली. 

सत्तेवर येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना मोठमोठी आश्‍वासने दिली. पण, सत्तेवर येताच सरकारच्या अंजेड्यावरून शेतकरी गायब झाला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी त्यांच्याबद्दल चुकीचे वक्‍तव्य करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करीत आहे. आधी तूर खरेदीवरून शेतकऱ्यांची कोंडी केली. आता शेतकऱ्यांच्या 

हिंगण्‍यात राकाँचा मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केला. सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्याची मागणी कार्यकर्त्यानी केली. आपल्या न्याय मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेली संपाची भूमिका योग्य असून त्याला आपचे समर्थन आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा आपने दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

प्रमुख मागण्या
-शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
- शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करा
- पुरेशा दाबाने अखंडित वीजपुरवठा करा
- शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध करून द्या
- आयात-निर्यात धोरण शेतकरीविरोधी नसावे

Web Title: vidarbha news nagpur news aap