स्वस्त धान्य दुकानात साडेसात हजार पॉस मशिन

ration-shops
ration-shops

अकोला : गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे. यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरीत करण्यासाठी सात हजार 343 पॉस (पीओएस - पॉईंट ऑफ सेल) मिशन बसविण्यात आली आहे. धान्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बायोमेट्रिक खात्री करूनच त्याला धान्य वितरीत करण्यात येणार आहे. यामुळे धान्य वितरणातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

अमरावती विभागात सर्वाधिक पॉस मशिन यवतमाळ जिल्ह्यात बसविण्यात आल्या आहेत. यवतमाळ तालुक्यात २ हजार ६९ मशिन बसविण्यात आल्या आहे. पुसद तालुक्यात सर्वाधिक २०० तर यवतमाळमध्ये १९३ मशिन बसविण्यात आले आहे. झरीजामणी या आदिवासी बहुल तालुकयात १०२ मशिन बसविण्यात आल्या आहे.

अमरावती जिल्ह्यात १ हजार ९१२ मशिन बसविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक १६५ मशिन अचलपूर तालुक्यात बसविण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागातही मशिन बसविण्यात आल्या आहे. यात धारणी तालुक्यात १६१ तर चिखलदरा तालुक्यात१५२ मशिन कार्यरत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ५२४ मशिन बसविण्यात आल्या आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक १७४ तर त्यापाठोपाठ चिखली तालुक्यात १७१ मशिन बसविण्यात आल्या आहे. अकोला जिल्ह्यात एक हजार ६० मशिन बसविण्यात आल्या आहेत. यात ३०१ मशिन अकोला तालुक्यात आहे. अकोटमध्ये १६४ तर मूर्तिजापूर तालुक्यात १६३ मशिन बसविण्यात आल्या आहे. वाशिम जिल्ह्यात ७७८ मशिन असून, कारंजा तालुक्यात १४७ तर वाशिम तालुक्यात १४५ मशिन आहेत.

अशी होते यंत्रणा कार्यान्वित
लाभार्थी धान्य घेण्यासाठी रास्त भाव दुकानात आल्यानंतर त्याला अंगठा मशीनवर ठेऊन खात्री करावी लागेल. त्यानंतर लाभार्थीचा त्वरित संपूर्ण डाटा दिसून येईल. त्याला द्यायचे धान्य, त्याची रक्कम याबाबतच्या संपूर्ण तपशिलाची पावतीच मिशनमधून बाहेर पडेल. त्या पावतीच्या आधारे रास्त भाव धान्य दुकानदार धान्य देईल. अश पद्धतीने ई-पीडीएस व्यवहार होत असल्याने वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत मिळत आहे.

‘अनुदानातून बाहेर पडा’ योजना
शिधापत्रिकेवरील धान्य लाभार्थी घेत नाहीत तेच धान्य गरजू लोकांना मिळावे, यासाठी ‘गिव्ह इट अप’ ही योजना सुरू केली आहे त्याला ‘अनुदानातून बाहेर पडा’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यांना रेशनचे धान्य नको आहे त्यांना आपले धान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय या योजनेत दिला आहे. त्यातून बचत होणारे धान्य गरजूंना देण्यात येणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com