उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या शिपायाची गळफास लावून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

गुरुवारी रात्री तो नेहमी प्रमाणे भाड्याच्या खोलीत झोपला होता दूसरे दिवशी शुक्रवारला दुपारी दोन वाजताची वेळ होवुनही घरांचे दार बंद असल्याने शेजा-यांनी प्रथम आवाज दिला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना माहीती देण्यात आली त्यावेळी तो मुलाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला

एटापल्ली -  येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत कर्मचारी मिलिंद लोमेश शेंडे वय 37 वर्ष याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली 

मिलिंद हा गडचिरोली नगरी येथील रहिवासी असुन त्याच्यात अल्प दृष्टी दोष होता तो गेली पाच वर्षा पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयात नोकारीला आहे त्याचा परिवार दिवाळी निमित्य गावी गेलेला होता (ता 2) गुरुवारी रात्री तो नेहमी प्रमाणे भाड्याच्या खोलीत झोपला होता दूसरे दिवशी शुक्रवारला दुपारी दोन वाजताची वेळ होवुनही घरांचे दार बंद असल्याने शेजा-यांनी प्रथम आवाज दिला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना माहीती देण्यात आली त्यावेळी तो मुलाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी लागलीच पंचनामा करुण नातेवाहिकांना माहीती देण्यात आली म्रुत्यु पच्छात आई, बहिन, पत्नी व एक मुलगा अशा आप्त परिवार आहे आत्महत्येचे  कारण कळू शकले नाही.

Web Title: vidarbha news: suicide

टॅग्स