सोनसाखळी चोराला पकडले रंगेहाथ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

माहेश्‍वरी भवनजवळून माधवी करमकर (५७) या पायी जात होत्या. त्यांच्या पाठीमागून एक युवक आला. त्याने त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याची साखळी ओढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माधवी करमकर या आरडाओरड केली. त्यावेळी तेथून दुचाकीवरून जात असलेले सायबर सेलचे पोलिस कर्मचारी अरूण आसटकर (ब. नं. २३६६) यांनी त्या युवकाचा पाठलाग करून त्याला पकडले

अकोला : वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी तोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकास सायबर सेलच्या पोलिस कर्मचाऱ्याने पाठलाग करून  पकडले. ही घटना माहेश्‍वरी भवनाजवळ घडली. पोलिस अधीक्षकांनी पोलिस कर्मचाऱ्याचा सत्कार केला.

माहेश्‍वरी भवनजवळून माधवी करमकर (५७) या पायी जात होत्या. त्यांच्या पाठीमागून एक युवक आला. त्याने त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याची साखळी ओढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माधवी करमकर या आरडाओरड केली. त्यावेळी तेथून दुचाकीवरून जात असलेले सायबर सेलचे पोलिस कर्मचारी अरूण आसटकर (ब. नं. २३६६) यांनी त्या युवकाचा पाठलाग करून त्याला पकडले. परिसरातील युवकांनीही त्यांना मदत केली. त्यानंतर त्याला कोतवाली पोलिस ठाण्यात आणले. त्याने आपली ओळख शेख समीर शेख अफसर (२०, रा. नायगाव) अशी सांगितली. पोलिसांनी त्याच्याजवळून पाच ग्रॅम सोन्याची साखळीही जप्त केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, गुरुवारी न्यायालयात हजर करणार आहेत.

दरम्यान, पोलिस कर्मचारी अरूण आसटकर यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांचा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, यांनी त्याचा सत्कार केला.

Web Title: vidarbha news: theft

टॅग्स