आंतरराष्ट्रीय ड्युल बॉक्सिंग :सवणा येथील बॉक्सर अनंताने भारतासाठी जिंकले सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

घरी दोन एकर जमीन आई व वडील मजुरीने काम करून प्रपंच चालवतात अशा परिस्थितीवर मात करून व महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीत बॉक्सिंगचे धडे गिरवित अनंताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा मान पटकावला

चिखली - पटियाला (पंजाब) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करीत श्री चंदनशेष क्रीडा मंडळ, सवणा येथील बॉयसर अनंता प्रल्हाद चोपडे याने 52 किलो वजनगटात सिंगापूरच्या हमीद एम.डी.बिन याचा गुणांच्या आधारावर पराभव करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सवण्याचा रहीवाशी असलेला अनंता चोपडे हा अकोला क्रीडा प्रबोधिनीचा प्रशिक्षणार्थी असून राज्य क्रीडा मार्गदश्रक सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीची तयारी असली तर अशक्यप्राय असणार्‍या गोष्टीतही सहज यश संपादन करता येवू शकते याचाच प्रत्ङ्ग सवण्याचा युवा बॉक्सर अनंताने आणून दिला आहे. घरी दोन एकर जमीन आई व वडील मजुरीने काम करून प्रपंच चालवतात अशा परिस्थितीवर मात करून व महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीत बॉक्सिंगचे धडे गिरवित अनंताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. अनंताने या आधी सुध्दा वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक आणि मेट्रो कप जिंकला आहे.  सबज्युनिअर राष्ट्रीय व शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, सातत्याने आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणात सहभागी होत आहे.

सवणा (ता.चिखली जि.बुलडाणा) येथील श्री.चंदनशेष क्रीडा मंडळाच्या मैदानावर वयाच्या आठव्या वर्षापासून धावण्याचा सराव करीत सन 2008 मध्ये वर्ग चवथीमध्ये शिकत असतांना त्याचे परिश्रम प्रथम कैलास करवंदे यांच्या मार्गदर्शनात अनंताची निवड क्रीडा प्रबोधिनीत झाली होती. त्याच्या या यशामुळे श्री चंदनशेष क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

Web Title: vidarbha news:boxing