विदर्भ राज्यातच शिवसेनेला ‘अच्छे दिन’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नागपूर - ‘शिवसेनेने वेगळ्या विदर्भ राज्यासाठी मदत केली, तर दोन्ही राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता मिळविता येईल. स्वतःच्या मानसिक चौकटीच्या बाहेर जाऊन आपण विचार केला, तरच विदर्भ आणि शिवसेना या दोघांनाही ‘अच्छे दिन’ येतील. अन्यथा दोघेही गरीबच राहतील,’ असा राजकीय सल्ला ज्येष्ठ विदर्भवादी अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना खुल्या पत्राद्वारे दिला आहे. 

पक्षबांधणीसाठी उद्या (शुक्रवार) उद्धव ठाकरे नागपुरात येत आहेत. त्यानिमित्ताने खांदेवाले यांनी पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंपुढे विदर्भ राज्याच्या अनुषंगाने प्रश्‍न ठेवले आहेत. विदर्भातील लोकांचा आपल्या विदर्भ विरोधी भूमिकेवर आक्षेप आहे, शिवसेनेवर मुळीच नाही. पण, स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांचे विदर्भ राज्याबद्दलचे मत जाणून घेतले तर आपल्याला धक्का बसेल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रात असल्याने निधी मिळविण्यातही अपयश येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘केंद्र सरकारचे शिलकीचे कर उत्पन्न वित्त आयोग नेमून ठरावीक सूत्रांप्रमाणे राज्यांमध्ये वाटून दिले जाते. गरीब राज्यांना जास्त वाटा मिळतो. विदर्भ गरीब असूनही श्रीमंत महाराष्ट्राचा भाग असल्यामुळे तेथेही नुकसानच होत आहे. विदर्भ राज्य झाल्यास मागासलेपणाच्या आधारावर निदान तिप्पट निधी मिळाला असता,’ असे खांदेवाले यांनी नमूद केले आहे. छोट्या राज्यांच्या प्रगतीचा आलेख एकदा आपण तपासून बघावा, असे आवाहनही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. अमरावती, बुलडाणा, वाशीम-यवतमाळ मतदारसंघातील लोकांनी शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान केले. पण, आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आत्महत्याग्रस्त अमरावती विभागासाठी कोणते कार्य केले, असा सवालही त्यांनी केला आहे. 

‘युतीबद्दलचे धोरण काय?’
‘आम्ही २५ वर्षे युतीत सडलो’ असे जाहीर करणाऱ्या शिवसेनेने लगेच युती करून विधान परिषदेच्या तीन जागा मिळवून घेतल्या. तुमचे युतीबद्दलचे नेमके धोरण तरी काय?, असा सवाल करून प्रश्‍न केवळ निवडणुकीचा नसून शिवसेनेच्या मूल्यांचा आहे, असेही खांदेवाले म्हणतात.

Web Title: Vidarbha Shivsena Acche Din Uddhav Thackeray Politics