Separate Vidarbha State: 'विदर्भाचे राज्य केव्हा?' फडणवीसांसह खासदारांना गावबंदी, महाराष्ट्रदिनी होणार आंदोलन | Devendra Fadnavis News | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidarbha State Movement Committee to protest Maharashtra Day 10 MP Devendra Fadnavis politics

Separate Vidarbha State: 'विदर्भाचे राज्य केव्हा?' फडणवीसांसह खासदारांना गावबंदी, महाराष्ट्रदिनी होणार आंदोलन

Separate Vidarbha State Demand: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने १ मे ला महाराष्ट्र दिनाचा निषेध करण्यासाठी उमरेड येथे कोयला रोको आंदोलन करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील सर्व १० खासदारांना गावबंदी करण्यात येणार आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समिती कोअर कमिटीची बैठक रविवारी घेण्यात आली. त्यात हे ठराव करण्यात आले. विदर्भ निर्माण यात्रा पूर्व- पश्चिम विदर्भातील ज्या तालुक्यांमधून गेली नाही अशा प्रत्येक तालुक्यात तालुकास्थळी १ जाहीर सभा घ्यावी.

यात्रा संपल्यानंतर १ जाहीर सभा जिल्हा मुख्यालयी आयोजित करावी. विदर्भ राज्याचा युवा जागर करणारे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह जिल्ह्यातील खासदारांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना गावबंदी करून विदर्भाचे राज्य केव्हा देणार ? असे प्रश्न विचारावे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आंदोलनातील सहभाग वाढवावा. (Latest Marathi News)

स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव जे खासदार संसदेत व त्यांच्या पक्षाच्या अजेंडामध्ये घेणार नाहीत त्यांना विदर्भातील जनतेने मतदान करू नये.

केंद्र सरकारला विदर्भाच्या जनतेच्या भावना कळविण्याकरिता उमरेड जवळील वेकोलिच्या कोळसा खाणी समोरील रस्त्यावर कोयला रोको आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. (Marathi Tajya Batmya)

कोअर कमिटीच्या बैठकीला समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप, प्रदेश महिला अध्यक्षा रंजना मामर्डे, जेष्ठ नेते डॉ. श्रीनिवास खांदेवाले, पूर्व विदर्भाचे अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, विष्णुपंत आष्टीकर, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, माजी पोलिस आयुक्त डॉ. दिलीप झळके पाटील, प्रा. पुरुषोत्तम पाटील, बळीराजा पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र धावडे आदी उपस्थित होते.