विदर्भाला ‘नवतपा’चा आजपासून तडाखा

Temperature
Temperature

चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४६.६ अंश तापमान
नागपूर - विदर्भातील उन्हाच्या लाटेचा परिणाम दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होऊ लागला आहे. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पारा ४६ अंशांवर राहिला, तर चंद्रपूरला शुक्रवारी देशात सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उन्हाच्या चटक्‍यांसाठी प्रसिद्ध असलेला नवतपा उद्यापासून (ता. २५) सुरू होत असल्यामुळे पारा आणखी भडकण्याची शक्‍यता आहे. तसा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

आठवडाभरापासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव शुक्रवारी विदर्भात प्रकर्षाने जाणवला. विशेषत: पूर्व विदर्भातील चंद्रपूर व ब्रह्मपुरीसह नागपुरात उन्हाचे तीव्र चटके जाणवले. चंद्रपूर येथे देशात सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. 

जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले. इजिप्तमधील बहरिया येथे (४७.३ अंश सेल्सिअस) सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरनंतर ४६ अंश तापमानाची नोंद नागपुरात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com