बफरमधील युवकांना मिळाला विदेशात रोजगार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

नागपूर : जंगलावरील अवलंबत्व कमी करण्यासाठी पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील 44 गावांतील युवकांना आदरातिथ्याचे प्रशिक्षण दिले. राज्यातील या पहिल्या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या सहाशेपेक्षा अधिक मुलांना आतापर्यंत देश-विदेशातील तारांकित हॉटेलमध्ये रोजगार मिळाला आहे.

नागपूर : जंगलावरील अवलंबत्व कमी करण्यासाठी पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील 44 गावांतील युवकांना आदरातिथ्याचे प्रशिक्षण दिले. राज्यातील या पहिल्या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या सहाशेपेक्षा अधिक मुलांना आतापर्यंत देश-विदेशातील तारांकित हॉटेलमध्ये रोजगार मिळाला आहे.
पेंच प्रकल्पातील बफर क्षेत्रातील गावांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करून जंगलाचा विकास करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत आहे. वाघ आणि इतर वन्यजीवांना चांगला अधिवास मिळेल हा उद्देश वन विभागाचा आहे. या क्षेत्रातील युवकांना रोजगार मिळावा आणि खात्रीशीर नोकरीची हमी मिळावी, यासाठी पेंच प्रकल्प आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने पेस आदरातिथ्य प्रशिक्षण केंद्र सिल्लारी येथे सुरू केले. प्रशिक्षणातील युवकांना 100 टक्के नोकरी ही प्रमुख अट ठेवण्यात आली. या केंद्रात हाउसकिपिंग आणि फूड ऍण्ड ब्रेवरेज अशा दोन विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांची निवड करताना शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास आहे. वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत आहे. या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च पेंच फाउंडेशन आणि संबंधित व्याघ्र प्रकल्पाचे फाउंडेशन करीत असते. आतापर्यंत या केंद्रातून विदर्भातून जवळपास सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना केवळ राज्यातच नव्हे तर विदेशातील हॉटेल्समध्ये रोजगार मिळाला आहे. अशा प्रकारचे हे राज्यातले एकमेव केंद्र आहे. या केंद्राचा दुसरा वर्धापनदिन नुकताच झाला. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये आणि क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर, सहायक वन संरक्षक गीता नन्नावरे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अतुल देवकर उपस्थित होते.
तारांकित हॉटेलमध्ये रोजगार
प्रशिक्षण केंद्राच्या केंद्रप्रमुख भारती प्रजापती यांनी प्रशिक्षण केंद्राचा गेल्या दोन वर्षांचा आढावा मांडला. केंद्रातील 17 व्या बॅचचा पदवीदान सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राबरोबरच तारांकित हॉटेलमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आला

Web Title: vidarbha youth get employment