"ट्रायल रूम'मध्ये कपडे बदलताय? सावधान!! 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कपडे बदलतानाचे अश्‍लिल व्हिडिओ बनण्यासाठी दुकानदार नोकराच्या मदतीने छुपे कॅमेरे बसवत आहेत. त्यानंतर हेच दुकानदार आणि नोकर मोठ्या चवीने एकमेकांना शेअर करीत पाहतात.

नागपूर : युवतींनो कपड्याच्या दुकानात, मॉल किंवा शोरूममध्ये कपडे खरेदी केल्यानंतर ट्रायलरूममध्ये जर कपडे बदलवित असाल तर सावधान... कपडे बदलतानाचे अश्‍लिल व्हिडिओ बनण्यासाठी दुकानदार नोकराच्या मदतीने छुपे कॅमेरे बसवत आहेत. त्यानंतर हेच दुकानदार आणि नोकर मोठ्या चवीने एकमेकांना शेअर करीत पाहतात.

असाच एक प्रकार सीताबर्डीतील एका कपड्याच्या दुकानात उघडकीस आला. या प्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी दुकानाचा मालक आणि नोकरावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीवरून दुकानाचा मालक किसन इंदरचंद अग्रवाल (वय 54, रा. प्लॉट 79, वर्धमान नगर) आणि नोकर निखिल उर्फ पिंटू दिपक चौथमल (वय 27, रा. शितला माता मंदिरजवळ, पाचपावली) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही पोलिसांनी अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: videos gets viral in changing room