विधान परिषदेसाठी 'ऍडव्हांटेज बीजेपी'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नागपूर - विधान परिषदेसाठी विदर्भातील दोन स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजप सत्ता कायम राखण्याची शक्‍यता आहे. या अमरावती व चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघाची निवडणूक 21 मे रोजी होत आहे. उद्योग राज्यमंत्री व भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवार आहेत.

सलग दुसऱ्यांदा ते या मतदारसंघातून उभे आहेत. या मतदारसंघात भाजपला पूर्ण बहुमत नसले, तरी शिवसेना व अपक्ष सदस्यांच्या मदतीने त्यांची नाव किनाऱ्याला लागण्याची शक्‍यता आहे. चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काहीशी चुरस निर्माण झाली आहे.

कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी या निवडणुकीत अर्थबळ ओतल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार व रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. रामदास आंबटकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने इंद्रकुमार सराफ यांना उमेदवारी दिली आहे. इंद्रकुमार सराफ हे वर्धा शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांचे वडील आहेत. यामुळे या निवडणुकीत शिवसेनेच्या सदस्यांची काय भूमिका राहणार, हे महत्त्वाचे आहे.

Web Title: vidhan parishad advantage BJP politics