माणिकराव ठाकरे यांचा पत्ता कट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

नागपूर - विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्याऐवजी काँग्रेसचे उमेदवार म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

विधान परिषदेचे सदस्य माणिकराव ठाकरे यांच्यासह अकरा आमदारांचा सहा वर्षांचा कार्यकाळ येत्या १७ जुलैला संपत आहेत. यात काँग्रसचे आमदार माणिकराव ठाकरे यांच्यासह शरद  रणपिसे आणि संजय दत्त यांचा समावेश आहे. काँग्रेसचे दोनच उमेदवार विधान परिषदेवर जाऊ शकतात. हे लक्षात घेऊन  रणपिसे आणि डॉ. मिर्झा यांचीच उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. माणिकराव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षसुद्धा होते. यवतमाळ जिल्ह्यातील कुणबी, दलित आणि मुस्लिम मतदारांची मोट बांधण्यासाठी डॉ. मिर्झा यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने सोशल इंजिनिअरिंग केल्याचे बोलल्या जात आहे. डॉ. मिर्झा निष्ठावान कार्यकर्ते आहेत. नवा चेहरा देऊन काँग्रेसने यवतमाळ जिल्ह्यात धक्कातंत्राचा वापर केला आहे.

Web Title: Vidhan Parishad manikrao Thackeray congress Dr. vajahat Mirza Politics