Vidhan Sabha 2019 : फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री; गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

Vidhan Sabha 2019 bjp leader Nitin Gadkari statement after voting Nagpur
Vidhan Sabha 2019 bjp leader Nitin Gadkari statement after voting Nagpur

नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीने चांगले काम केले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता पुन्हा महायुतीवरच विश्वास टाकेल आणि देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 

नागपुरात गडकरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील जनतेला त्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच यंदा राज्यात मतदानाची टक्केवारी चांगली राहील. प्रतिसाद चांगला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

नोटाचा वापर उपयोगाचा नाही
नोटा (NOTA)ला मतदान करणं योग्य नाही असं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं. ते म्हणाले, 'लोकशाहीमध्ये गुणात्मक सुधारणा करण्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे आणि उमेदवार निवडून देणं महत्त्वाचं आहे,' असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. 

गडकरी म्हणाले, 'मतदान हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आहे. मतदान करणे लोकतांत्रिक अधिकार असून, त्याचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करा. पाच वर्षांमध्ये देशात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वात तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठा विकास झाला आहे. विकासाच्या बळावर जनता भाजपसोबत आहे. निवडणुकीत भाजप रेकॉर्डब्रेक मताधिक्‍याने विजयी होईल. तसेच देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com