Vidhan Sabha 2019 : कॉंग्रेस, राष्ट्रवादीने 15 वर्षांचा हिशेब द्यावा : मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

तुमसर (जि. भंडारा) : राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची 15 वर्षे सत्ता होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या विकासकामांचा आधी हिशेब द्यावा. आम्ही पाच वर्षांत त्यांच्यापेक्षा दुप्पट कामे केली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तुमसर येथे शुक्रवारी भाजप-सेना युतीचे उमेदवार प्रदीप पडोळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी मंचावर खासदार सुनील मेंढे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिशुपाल पटले, म्हाडा सभापती तारिक कुरेशी, अनिल बावनकर, योगेश सिंगनजुडे, आशीष कुकडे, राजा लांजेवार, सुनील पारधी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 41 आमदार निवडून आले होते. आता केवळ 20 आमदार निवडून येतील. कॉंग्रेसची स्थितीही अतिशय वाईट आहे. निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी फिरायला गेले होते.
राज्यात भाजप सरकारच्या काळात 18 हजार गावांत पाणीपुरवठा केला. 2021 पर्यंत सर्वांना घरे मिळणार आहेत. या भागात वैनगंगेवरील रोहा-मुंढरी पूल बांधकामाला मंजुरी दिली आहे. तुमसर शहराला आतापर्यंत 150 कोटींचा निधी दिला आहे. राज्यात 40 लाख बचतगटांच्या महिलांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बंडखोर निवडून येणार नाही
राज्यात बंडखोरांनी उमेदवारी दाखल केली आहे. पण, एकही बंडखोर निवडून येणार नाही. 24 तारखेनंतर बंडखोरांसाठी भाजपचे दरवाजे बंद होतील. त्यांना पक्षात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रदीप पडोळे यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार मेंढे, माजी खासदार शिशुपाल पटले, ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. संचालन नितीन कारेमोरे यांनी केले. आभार आशीष कुकडे यांनी मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019: Congress, NCP should give 15-year reckoning: Chief Minister Fadnavis