Vidhansabha 2019 : आम्हालाही व्हायचंय आमदार

MLA
MLA

चौहान, डोणेकर, गोडबोले, कंभाले, गोतमारेही करणार दावा
नागपूर - अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सदस्यांना  आता आमदार व्हायचे आहे. अनेकांनी विधानसभेची आपल्या पातळीवर तयारीसुद्धा केली आहे. यात झेडपीचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिक्षण व वित्त सभापती उकेश चौहान, नाना कंभाले,  माजी अध्यक्ष संध्या गोतमारे, देवेंद्र गोडबोले, माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नावाचा  समोवश आहे.

शदर डोणेकर शिवसेनेचे सदस्य आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघात त्यांची तयारी सुरू आहे. येथे भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी आमदार आहेत. मागील निवडणुकीत युती व आघाडी तुटल्याने सर्वच स्वतंत्रपणे लढले होते. यंदा मात्र तशी परिस्थिती दिसत नाही. रामटेकमधून शिवसेनेचे आशीष जयस्वाल तीनवेळा निवडून आले होते. मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ते सध्या खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचाही दावा रामटेकवर राहणार आहे. सध्या येथे भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी आमदार आहेत. त्यामुळे डोणेकर यांना  उमेदवारीसाठी आधी संघर्ष करावा लागणार आहे. ते बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात असल्याचेही बोलल्या जात आहे. येथे काँग्रेसचे राजेंद्र मुळक आधीपासूनच कामाला लागले आहेत. 

भाजपचे उकेश चौहान काटोल विधानसभेसाठी उत्सुक आहेत. मात्र, त्यांना येथील चरण ठाकूर यांच्याशी संघर्ष करावा लागेल. भाजपचे विस्तारक अविनाश ठाकरे हेसुद्धा संधीच्या शोधात आहेत. कामठीतून नाना कंभाले काँग्रेसकडून इच्छुक आहेत. हिंगण्यातून संध्या गोतमारेही दावा करण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले यांचे पती आणि माजी सदस्य देवेंद्र गोडबोले हेसुद्धा पालकमंत्र्यांच्या विरोधात जिद्दीला पेटले आहेत. नागपूर जिल्हा परिषदेतून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर पारवे, अनिल देशमुख, रणजित देशमुख, विजय घोडमारे विधानसभेत दाखल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com