Vidhansabha 2019 : इच्छुकांचा प्रचारात हिरिरीने सहभाग

Yavatmal-Constituency
Yavatmal-Constituency

विधानसभेचे आडाखे बांधतच मतदारसंघात युती आणि आघाडीच्या नेत्यांनी प्रचारात सहभाग नोंदवला. विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेल्यांनी प्रचारात आघाडीवर राहण्याची एकही संधी सोडली नाही; तसेच हेवेदावे आणि मतभेदांचे दर्शनही झाले.

लोकसभेची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीमच होती. इच्छुक आणि विद्यमान आमदारांना आपले ‘जॉब कार्ड’ लिहिण्याची नामी संधी यामधून प्राप्त झालेली होती. यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान चार, शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’च्या प्रत्येकी एका आमदाराला ही परीक्षा द्यावी लागली. लोकसभा निवडणुकीआड त्यांनी प्रचाराची बीजपेरणीही करून घेतली.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद हे चार; तर वाशीम जिल्ह्यातील वाशीम आणि कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यातच थेट लढत झाली. त्यांच्या विजयाचे गणित पक्षीय आणि जातीय राजकारणात आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची खिंड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, बाबासाहेब गाडे पाटील यांनी लढवली. मात्र, किसान काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष देवानंद पवार आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे प्रचारात दिसले नाहीत. भाजपचे आमदार मदन येरावार यांनी प्रचारसभांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारासोबत हजेरी लावली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या उमेदवाराचे काम केले; परंतु उत्साही सहभाग नव्हता.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांचे सर्व लक्ष यवतमाळ सोडून चंद्रपूरच्या उमेदवाराकडे होते. राळेगावात काँग्रेसचे वसंत पुरके आणि आमदार अशोक उईके हे पुन्हा दावेदार आहेत. कळंब विकास आघाडीचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या काँग्रेसप्रवेशाने पुरके प्रचारात रमले नाहीत. मात्र, उईके यांनी आपल्या प्रचाराची एकही संधी सोडली नाही. 

दिग्रसमध्ये भाजपचे संजय देशमुख आणि शिवसेनेचे संजय राठोड एकत्र दिसले नाहीत. शिवसेनेतील मतभेद प्रचारातही उघड झाले. पुसद मतदारसंघात भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले नाईक घराण्यातील ॲड. नीलय नाईक यांचा फारसा प्रभाव दिसला नाही. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर नाईकांनी मात्र काँग्रेससाठी इमानेईतबारे काम केले. 

वाशीम आणि कारंजा विधानसभा मतदारसंघात मात्र युती आणि आघाडीच्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारासाठी काम केले. वाशीममधून विद्यमान आमदार लखन मलीक नाराज असतानाही शिवसेनेच्या उमेदवाराच्या मदतीला धावले. काँग्रेसचे समाधान ठाकरे आणि ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी सर्व शक्ती पणाला लावली. कारंजाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी आणि शिवसेनेतील इच्छुक प्रकाश डहाके; तसेच ‘राष्ट्रवादी’चे सुभाष ठाकरे यांनीही आपल्या पक्षीय धर्माचे पालन केले. ज्यांना विधानसभा लढायची आहे, त्यांनी पक्षासोबत इमान राखले, असेच चित्र होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com