प्रशांत पवार, कुमेरिया, पेठेंची बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

नागपूर : दक्षिण नागपूरध्ये पुन्हा एका बंडखोराची भर पडली असून शिवसेनेचे दक्षिण विधानसभाप्रमुख व माजी उपमहापौर किशोर कुमेरियांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहे. राष्ट्रवादीसाठी एकही जागा सोडली नसल्याने पूर्व नागपूरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांनीही बंडाचा झेंडा फडकावला आहे. 

नागपूर : दक्षिण नागपूरध्ये पुन्हा एका बंडखोराची भर पडली असून शिवसेनेचे दक्षिण विधानसभाप्रमुख व माजी उपमहापौर किशोर कुमेरियांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले आहे. राष्ट्रवादीसाठी एकही जागा सोडली नसल्याने पूर्व नागपूरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांनीही बंडाचा झेंडा फडकावला आहे. 
दक्षिणेत भाजपला आमदार सुधाकर कोहळे यांची समजूत काढण्यात यश आले आहे. आज ते भाजपचे उमेदवार मोहन मते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोबत आले होते. मात्र, येथून भाजपचे नगरसेवक तसेच माजी उपमहापौर सतीश होले यांनी कालच बंड पुकारून भाजपला धक्का दिला. याच मतदारसंघात कॉंग्रेसचे प्रमोद मानमोडे यांनी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असे जाहीर करून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक राजू नागुलवार यांनीही दावेदारी दाखल करून आपले इरादे स्पष्ट केले आहे. 
दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जय जवान जय किसानचे अध्यक्ष तसेच माजी खासदार नाना पटोले यांचे समर्थक प्रशांत पवार यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांच्याऐवजी कॉंग्रेसने माजी आमदार आशीष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पवार यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. उत्तर नागपूरमधून बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे नाराज झालेले बसपचे नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी बंड पुकराले आहे. याच मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांच्या विरोधात नगरेसवक मनोज सांगोळे यांनीही बंड पुकारले. त्यांनी यापूर्वीच राऊत यांना उमेदवारी दिल्यास बंड करू असा इशारा दिला होता. मध्य नागपूरमधून कॉंग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. त्यांचे नाव येथून आघाडीवर होते. हलबा समाजाचे असल्याने याचा फटका भाजपला बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhansabha election, rebel