काँग्रेसच्या मागासवर्गीय समाज विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदी विजय अंभोरे

संजय सोनोने
रविवार, 10 मार्च 2019

शेगाव जि.बुलडाणा : काँग्रेस पक्ष ज्या प्रमाने गावागावात मजबूत आहे, त्याच प्रमाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचा भाग असलेला अनुसुचित जाती विभाग राज्यातल्या प्रत्येक गावात पोहचवून त्यागावात या विभाजाची स्ट्रॉंग शाखा करण्याचा निर्धार नवे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी केला आहे. अध्यक्षपद निळाल्यानंतर त्यांनी 'सकाळ'शी बोलतांना आगामी काळातील अनुसुचीत जाती विभागाचा अंजेडा सांगीतला.

अंभोरे म्हणाले, "प्रदेशाध्यक्षपद देवून काँग्रेस पक्षाने माझ्या सारख्या मागासवर्गीय समाजातल्या एका कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे. मी आतापर्यंत ज्या निष्ठेने पक्षाचे काम केले त्यामुळे राहूल गांधी, मुकूल वासनिक, नितीन राऊत, अशोक चव्हाण यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली याची जाणीव ठेवून आपण मागासवर्गीयांचे संघटन मजबूत करण्यावर आपला भर राहणार आहे."

नरेंद्र मोदी केंद्रात तर राज्यात देवेंद्र फडणविस यांचे सरकार मागासवर्गीय, दलितांच्या विरोधी काम करत आहेत. या सरकारच्या घटना विरोधी अजेड्यामुळे अनुसुचीत जातीच्या अस्तित्वाचाच प्रश्नच निर्माण झाला आहे. मागासवर्गीय समाजाला सरकारच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करून समाजात जन जागृती करण्याचाही विचार असल्याचे त्यांनी अंभोरे यांनी सांगीतले. 

गेल्या पाच वर्षीत मागासवर्गीयांच्या उत्थानाची एकही योजना या सरकारने आणली नाही, उलट दोन वर्षापासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा झाली नाही. विशेष घटक योजनेसाठी फंड नाही असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस पक्षा प्रमाणे प्रत्येक गावात अनुसुचीत जाती विभागाची शाखा झाल्यानंतर मागासवर्गीय लोकांची कामे गावातल्या गावातच लवकर पुर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Ambhore is new State President of the Backward Class Society of Congress