शाळांमधून योगशिक्षण सक्तीचे व्हावे : विजय भटकर

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

राष्ट्रपती पदासाठी डॉ. भटकर यांचे नाव गेले काही दिवस चांगलेच चर्चेत राहिले. त्यासंदर्भात ग्रामस्थांनी भावनिक होत खंत व्यक्त केली तेव्हा,'बरे झाले. स्वतःला पाच वर्षे सर्व घटनात्मक बंधनांमध्ये स्वतःला मी बांधून ठेवू शकलो नसतो. उन्नत भारत अभियानाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असते.' अशी प्रतिक्रिया त्यांनी सहजपणे व्यक्य केली

मूर्तिजापूर - योगशिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शाळांमधून योगशिक्षण सक्तीचे व्हावे, पहिला तास योगशिक्षणाचा असावा, असे आग्रही प्रतिपादन संगणक तज्ज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी आज केले. 

डॉ. भटकर या तालुक्यातील त्यांच्या मुरंबा या मुळ गावी आल्यानंतर आज सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्य ईंडिया इंटरनॅशनल मल्टीव्हर्सिटी व प्रजापिता ब्रम्हकुमारी इश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने तेथील डॉ. भटकर यांच्या शेतातील 'डोम' सभागृहात आयोजित सामुहिक योग कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर योगमहात्म्य वर्णन करतांना त्यांनी आरोग्याचे महत्व लक्षात घ्या, सुदृढ प्रकृतीसाठी जीवनात योगाला प्राधान्य द्या, दिनचर्येतील किमान एक तास योगासाठी द्या, असे आवाहन केले.

गुरूकूल मधील विद्यार्थ्यांसमवेतच योगशिक्षक राजुअन्ना भटकर, ब्रम्हकुमारी आरती दिदी, डॉ. अनिल वाघ, डॉ. भटकर यांच्या भगिनी आशाताई यांच्यासोबत डॉ. भटकर सामुहिक  योगवर्गात सहभागी झाले. 

....बरे झाले !
राष्ट्रपती पदासाठी डॉ. भटकर यांचे नाव गेले काही दिवस चांगलेच चर्चेत राहिले. त्यासंदर्भात ग्रामस्थांनी भावनिक होत खंत व्यक्त केली तेव्हा,'बरे झाले. स्वतःला पाच वर्षे सर्व घटनात्मक बंधनांमध्ये स्वतःला मी बांधून ठेवू शकलो नसतो. उन्नत भारत अभियानाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असते.' अशी प्रतिक्रिया त्यांनी सहजपणे व्यक्य केली.

शेतकरी, शासनाला सल्ला !
शेतकऱ्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावे, संघटीत व्हावे.सरकारनेही शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. तरच शेतकऱ्यांच्या जिवनात सुधार होईल. वीषमुक्त शेतीचाही पर्याय मौल्यवान आहे. असा सल्ला शेतकरी व शासनाला डॉ. भटकर यांनी दिला.

Web Title: Vijay Bhatkar bats for yoga education