विजय चव्हाण नागपूरचे नवे डीसीपी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नागपूर, ता. 22 : भारतीय पोलिस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील चार पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने मंगळवारी जारी केले. यामध्ये नागपूरचे उपायुक्‍त राजतिलक रौशन यांचा समावेश आहे. तर नागपुरात वाशीमचे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक विजय चव्हाण यांची बदली झाली आहे.

आयआयटी खडगपूरचे विद्यार्थी असलेले उपायुक्त राजतिलक रौशन इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड इलेक्‍ट्रिकल्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतीय पोलिस सेवेत रुजू झाले. ऑगस्ट 2018 मध्ये ते नागपुरात बदलून आले. त्यांनी वर्षभराच्या कालावधीत हसतमुख, मितभाषी आणि सौजन्यशील आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. त्यांना प्रारंभी वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी जबाबदारी सोपविली होती. सहा महिन्यांच्या सेवाकाळात नागपुरातील विस्कळीत वाहतुकीला लगाम घालण्याची जबाबदारी रौशन यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. त्यानंतर त्यांना परिमंडळ चारचे उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. नागपुरातील 12 महिन्यांच्या सेवाकाळात घरून निघून गेलेल्या, फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या 550 अल्पवयीन मुलामुलींना शोधून त्यांच्या पालकांच्या हवाली करण्याची कामगिरी बजावली. वाशीमचे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक विजय चव्हाण यांची नागपुरात बदली झाली आहे. तसेच येथे दहशतवादविरोधी विभागाचे सहायक पोलिस आयुक्‍त सुनील बोंडे यांची मुंबईत एसीपी म्हणून बदली झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay chavan new dcp