संघाचा विजयादशमी उत्सव उद्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन तथा विजयादशमी उत्सव मंगळवारी (ता. ११) सकाळी ७.३० वाजता रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे उद्‌बोधन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे संरक्षक सत्यप्रकाश राय उपस्थित राहतील. 

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन तथा विजयादशमी उत्सव मंगळवारी (ता. ११) सकाळी ७.३० वाजता रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे उद्‌बोधन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे संरक्षक सत्यप्रकाश राय उपस्थित राहतील. 

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.१५ वाजता पथसंचलनाने होईल. यात दोन पथके दोन  वेगवेगळ्या मार्गांनी जाणार आहेत. यानंतर शारीरिक कार्यक्रम, घोषवादन, सांघिक गीत होईल. संघाच्या गणवेशात झालेल्या बदलामुळे यंदा नवीन गणवेशात स्वयंसेवक या उत्सवात सहभागी होतील. सरसंघचालकांचे भाषणाचे थेट प्रक्षेपण www.vsknagpur.org या  वेबसाइटवर बघता येणार आहे. प्रमुख पाहुणे सत्यप्रकाश राय भारतीय आर्थिक सेवाचे तुकडीचे निवृत्त अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी अखिल भारतीय सफाई मजदूर संघ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला व सध्या ते या संस्थेचे संरक्षक आहेत. डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या म्युन्सिपल वर्कर्स संघाचे अ. भा. प्रमुख संरक्षक आहेत. अखिल भारतीय  हरिजन लीग या संस्थेचे ते सध्या राष्ट्रीय महामंत्री आहेत. 

पथसंचलनाचा मार्ग
पथसंचलन पथकांमध्ये व्यवसायी तरुण आणि महाविद्यालयीन तरुण क्रमशः राहतील. व्यवसायी गटाचा मार्ग रेशीमबाग मैदान, लोकांची शाळा चौक, नागनदी पूल, झेंडा चौक, कल्याणेश्‍वर  मंदिर, महाल चौक, मातृसेवा संघ, सी. पी. ॲण्ड बेरार कॉलेज व परत रेशीमबाग मैदान असा राहील. तर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गटाचा मार्ग रेशीमबाग मैदान, स्मृती मंदिर गेट, गजानन चौक, संगम टाकीज, तिरंगा चौक, सक्करदरा चौक, बाजार, कमला नेहरू कॉलेज, ईश्‍वर  देशमुख कॉलेज, रेशीमबाग चौक, केशवद्वार, परत रेशीमबाग मैदान असा राहील.

Web Title: vijayadashami utsav by rss

टॅग्स