Election Results 2019 : पश्‍चिम नागपूर : कॉंग्रेसचे विकास ठाकरे विजयी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

कॉंग्रेसच्या विकास ठाकरे यांच्यासाठी अस्तिवाची लढाई मानल्या जाणाऱ्या पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना सुरुवातीपासून आघाडी मिळाली. सातत्याने निवडूण येत असल्याने पश्‍चिम नागपूर आता भाजपचा बालेकिल्ला झाला होता. विभाजित होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

नागपूर : भाजपचे आमदार आणि राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले सुधाकर देशमुख यांचा धक्‍कादायक पराभव झाला. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांना 5800 मतांनी पराभूत केले. 
कॉंग्रेसच्या विकास ठाकरे यांच्यासाठी अस्तिवाची लढाई मानल्या जाणाऱ्या पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना सुरुवातीपासून आघाडी मिळाली. सातत्याने निवडूण येत असल्याने पश्‍चिम नागपूर आता भाजपचा बालेकिल्ला झाला होता. विभाजित होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्यासारख्या दिग्गजांना त्यांनी पराभूत केले होते. देशमुख यांना पराभूत करण्यासाठी त्यावेळी कॉंग्रसेच्या अनेक नेत्यांनी हातभार लावला होता. देशमुख यांना सोनिया गांधी यांनी निवडूण आल्यास मुख्यमंत्री करण्याचे आशवान दिले होते. त्यामुळे अनेक नेते धास्तावले होते. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेक नेत्यांनी देशमुखांना पराभूत करण्यासाठी रसद पुरविली होती. पराभवानंतर रणजित देशमुख यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. मात्र देवेंद्र फडणवीस यांचा येथूनच खऱ्या अर्थाने राज्याच्या राजकारणात उदय झाला. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि मुख्यमंत्रीसुद्धा झाले. या दरम्यान पश्‍चिम मतदारसंघाचे विभाजन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने तयार झालेला दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघ निवडला. आता पश्‍चिम नागपूर मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात गेला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikas Thackeray of Congress wins