Election Results 2019 : पश्‍चिम नागपूर : पाचव्या फेरीत कॉंग्रेसचे विकास ठाकरे पुढे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

सातत्याने निवडूण येत असल्याने पश्‍चिम नागपूर आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. विभाजित होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

नागपूर : कॉंग्रेसच्या विकास ठाकरे यांच्यासाठी अस्तिवाची लढाई मानल्या जाणाऱ्या पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना आघाडी मिळाली आहे. पाचव्या फेरीत ठाकरे 5960 मतांनी पुढे आहेत. भाजपाचे विद्यमाने आमदार सुधारक देशमुख पिछाडीवर असल्याने पक्षात धाकधूक वाढली आहे. 
सातत्याने निवडूण येत असल्याने पश्‍चिम नागपूर आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. विभाजित होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्यासारख्या दिग्गजांना त्यांनी पराभूत केले होते. देशमुख यांना पराभूत करण्यासाठी त्यावेळी कॉंग्रसेच्या अनेक नेत्यांनी हातभार लावला होता. आता त्याचेच फळे कॉंग्रेस भोगत आहे. देशमुख यांना सोनिया गांधी यांनी निवडूण आल्यास मुख्यमंत्री करण्याचे आशवान दिले होते. त्यामुळे अनेक नेते धास्तावले होते. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेक नेत्यांनी देशमुखांना पराभूत करण्यासाठी रसद पुरविली होती. पराभवानंतर रणजित देशमुख यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. मात्र देवेंद्र फडणवीस यांचा येथूनच खऱ्या अर्थाने राज्याच्या राजकारणात उदय झाला. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि मुख्यमंत्रीसुद्धा झाले. या दरम्यान पश्‍चिम मतदारसंघाचे विभाजन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने तयार झालेला दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघ निवडला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikas Thakre ahead