मुत्तेमवार, ठाकरेविरोधकांची दिल्लीत ‘लॉबिंग’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नागपूर -  माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधकांनी दिल्लीत काँग्रेसचे महासचिव गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली. माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नागपूर लोकसभेसाठी नवीन उमेदवार देण्याची मागणी आझाद यांच्याकडे केली. शहर काँग्रेसमध्ये बदल करण्याची मागणी करीत त्यांनी विकास ठाकरे, विलास मुत्तेमवारांविरुद्ध जोरदार ‘लॉबिंग’ केली. त्यामुळे अद्याप शहर काँग्रेसमधील नेते एकत्र येण्यास तयार नसल्याचे दिसून येते.  

शहर काँग्रेसमधील दोन्ही गट दिल्लीत असून, आपापल्या गटाला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शहर काँग्रेसमधील स्थिती आझाद यांना सांगितली. आझाद यांनी शिष्टमंडळाच्या भावना राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचविल्या जातील, असे आश्‍वासन दिले. 

शिष्टमंडळात माजी आमदार अशोक धवड, मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नरेंद्र जिचकर, संजय दुबे, कृष्णकुमार पांडव, महाराष्ट प्रदेश काँग्रेस महासचिव कांता पराते, महिला काँग्रेस  शहर अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, नगरसेवक कमलेश चौधरी, नगरसेविका हर्षला साबळे, नगरसेवक दिनेश यादव, नगरसेवक परसराम मानवटकर, नगरसेविका आयेशा अन्सारी, किशोर जिचकर, माजी नगरसेवक अरुण डवरे, दीपक कापसे, राजेश जरगर, सुरेश जग्यासी, विजय वनवे, नरेंद्र मोहिते, नियामत ताजी, नाना झोडे, जब्बार भाई, रामू वाघ, अनिल वाघमारे, बाबा वकील, यादवराव श्रीपूरकर, फिलिप्स जैस्वाल, ठाकूर जग्यासी, दीपक खोब्रागडे, मिलिंद चावरे आदींचा समावेश होता.

Web Title: Vilas Muttemwar & vikas Thackeray opposition lobbying in Delhi