पाणी फाऊंडेशनअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावाचा सन्मान होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

संग्रामपूर : गाव पाणीदार करण्यासाठी व पाणी संचय वाढीसाठी उन्हळ्यात पाणी फाऊंडेशनअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावाचा सन्मान होणार आहे. यामध्ये खारपान पट्ट्यातील सग्रामपुर तालुक्याचा ही सहभाग आहे. 12 ऑगस्टला पुणे येथे आयोजित बक्षीस समारंभात स्पर्धेत सहभागी तालुक्यातील निवडक चार गावांना यामधे आमंत्रित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

भारतीय जैन संघटना आणि पाणी फाऊंडेशनच्या वतीने बुलडाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यात स्पर्धात्मक कामे करण्यात आली. यात श्रमदानातून गावागावात जिद्दीने मोठी कामे करण्यात आली. घाम गाळून गावाला पाणीदार करण्यासाठी लहान थोर राबून याचे फलित म्हणून खारपान पट्ट्यात एका पावसात हजारो लिटर पाणी अडवून जिरवण्यात यश आल्याचे दिसले.

ज्या गावांनी स्पर्धेदरम्यान मापदंडात बसून कामे केली. अशा गावांचे मूल्यमापन करून गुणांकन करण्यात आले आहे . या स्पर्धेत ज्या गावांचा नंबर लागणार अशा गावकऱ्यांचा सन्मान पुणे येथे करण्यात येणार आहे . यासाठी संग्रामपूर तालुक्यातून जवळपास 60 नागरिक या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. टॉपमध्ये चार गावांची नावे असून, बक्षिसास पात्र कोणते गाव ठरणार याची उत्सुकता तालुकावासीयांमध्ये लागली आहे .

Web Title: The village which will perform well under the water foundation will be honored