नक्षल्यांच्या भीतीने गावकरी ठाण्यातच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

आर्थिक मदत देण्याची मागणी
कसनासूर येथील घटनेनंतर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गडचिरोली येथे भारतीय मानवाधिकार परिषद संलग्नित नक्षल पीडित पुनर्वसन समितीने बुधवारी (ता. २३) नक्षलवाद्यांचा निषेध करून मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

गडचिरोली - तीन नागरिकांच्या हत्येनंतर कसनासूर गावात दहशतीचे वातावरण  असल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून कुटुंबासह ताडगाव येथील पोलिस ठाण्यात आश्रय घेतला आहे. दरम्यान मृतांवर मंगळवारी (ता. २२) रात्री ताडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. छत्तीसगडच्या सीमेलगत असलेले कसनासूर गाव वर्षभरापूर्वी ४० नक्षलवाद्यांच्या मृत्यूने चर्चेत आले होते. या घटनेमुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांनी तीन गावकऱ्यांची हत्या केल्याची चर्चा आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात पोलिस-नक्षल चकमकीत ५० च्या वर नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याने हिंसक कारवायांत कमी आली होती. विशेषतः चकमकीत दलम कमांडर तथा जहाल माओवादी मारले गेल्याने काही दलम संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत नक्षलवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून जिल्ह्यात दहशत पसरविण्यासाठी हिंसक कारवाया घडवून आणल्या जात आहेत. ४० घरांची वस्ती असलेल्या कसनासूर येथील तीन गावकऱ्यांची हत्या करून त्यांनी नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेतला. यामुळे येथील गावकरी कमालीचे धास्तावले आहेत. चार ते पाच वृद्ध वगळता सर्वच ग्रामस्थ सध्या ताडगाव पोलिसांच्या आश्रयाला आहेत. नक्षलवाद्यांच्या धास्तीने नातेवाइकांना

मृतावर त्यांच्या स्वगावी अंत्यसंस्कारही करता आले नाही. सध्या पोलिस ठाणेच त्यांचा निवारा बनले असून त्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था पोलिस प्रशासनाकडून केली जात आहे. 

आर्थिक मदत देण्याची मागणी
कसनासूर येथील घटनेनंतर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गडचिरोली येथे भारतीय मानवाधिकार परिषद संलग्नित नक्षल पीडित पुनर्वसन समितीने बुधवारी (ता. २३) नक्षलवाद्यांचा निषेध करून मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

Web Title: The villagers fear the Naxalite