दिव्यांग असूनही विनोद बनला दिनदुबळ्यांचा आधार !

Vinod Mulchandani is helping people
Vinod Mulchandani is helping people

अकोला : आयुष्य ही अडथळ्यांची शर्यत आहे. ज्याने ती पार केली तो जगणे शिकला. आधार शोधायला जात असताना निराधार होणे आणि नैराश्येच्या गर्तेत सापडून जीवन संपविण्याचे टोकाचे पाऊल उचलणे हे कितपत उचित आहे. तेव्हा, निसर्गाने दिलेल्या या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे म्हणत स्वतः दिव्यांग असून रस्त्यावरील दिनदुबळ्यांना मिठाईचे वाटप करण्याचे काम विनोद मुलचंदानी हे करत आहेत.

सिंधी कॅम्प परिसरातील किराणा दुकान चालविणारे विनोद मुलचंदानी जन्मतःच शंभर टक्के दिव्यांग आहेत. घरी परिस्थिती ठिकठाक असूनही केवळ जन्मतःच आलेल्या अपंगत्वामुळे इच्छा उर्मी आणि स्वप्नांवर विरजन पडले होते. ठरवलेली स्वप्ने पूर्ण करता आली नाहीत. मात्र, अशातही न हरता, न डगमगता विनोद मुलचंदानी तेवढेच श्रध्दाळू आहेत. स्वतः दुःखी असूनही रस्त्यावरील दिनदुबळ्यांच्या गालावर हसू फुलविणारे मुलचंदानी हे दशकभरापासून अनाथ, बेसहारांना दर गुरुवारी खाऊ, मिठाई, फळे आदी वाटप करतात. एवढ्यावरच न थांबता गायींसाठी घरून पोळ्या तयार करून आणतात. असं करण्यातून त्यांना अलौकिक आनंद मिळत असल्याचे ते सांगतात. 

नैराश्याच्या गर्तेत जाऊ नका!
मी जन्मताच शंभर टक्के दिव्यांग आहे. घरची परिस्थिती ठिकठाक असल्याने पाहिजे तेवढ्या हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले नाही. मात्र, जे शंभर टक्के धडधाकट आहेत. अशांनी लहान मोठ्या समस्या अंगीकारून त्याचा बाऊ करू नये. नैराश्य हे क्षणिक असते. आल्या पाऊली ते परतही जाते. तेव्हा नैराष्यात टोकाचे पाऊल न उचलता दिनदुबळ्यांच्या आयुष्यात आनंदाचा कवडसा आणून आपले जीवन सुखकर बनविता येते, असाही सल्ला विनोद मुलचंदानी युवकांना देऊ इच्छितात. 

अविरत सेवेचे दशक
जन्मता दिव्यांग असून आपल्यापेक्षा ज्यांची परिस्थिती कठीण आहे, अशांची मदत करावी या उद्देशाने दर गुरुवारी खाऊ आणि मिठाईचे वाटप करण्याची सुरुवात झाली होती. या अविरत सेवेला बघता-बघता दहा वर्षे लोटली. याचं कौतुक नाही तर ही अविरत सेवा अशीच घडू दे, अशीही प्रार्थना ते मनोमनी करीत असतात. छोटंसं किराणा दुकान चालवून शासनाचा कर तर ते भरतातच मात्र, त्यांच्या गाठीशी आता सेवेची बचतही जोडल्या गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com