खासगी वाहनचालकांकडून आचारसंहितेचा भंग 

file Photo
file Photo

नागपूर  : निवडणूक काळात मंजुरी मिळालेल्या वाहनांचा प्रचारासाठी वापर करता येतो. मंजुरीप्राप्त वाहनांवरच राजकीय पक्षांच्या चिन्हाचा वापर करता येतो. मात्र, जिल्ह्यात अनेक खासगी वाहनांवर राजकीय पक्षांच्या चिन्हाचा सर्रास वापर होत आहे. हा एकप्रकारे आचारसंहितेच्या नियमांचा भंग असल्याने अशा वाहनांवर कोण कारवाई करेल, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांकडून पक्ष व त्याला मिळालेल्या चिन्हाचा प्रचार करण्यात येत आहे. निवडणुकीत उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेच्या आत त्यांना खर्च करायचा आहे. मर्यादेपेक्षा जास्त खर्च करणाऱ्याचे सदस्यत्व रद्द होते. त्यामुळे उमेदवारांकडून करण्यात आलेल्या खर्चाचा हिशेब निवडणूक विभागाकडून घेण्यात येते, त्यावर लक्ष ठेवण्यात येते. उमेदवाराला प्रचार सभा, रॅली, वाहनांच्या वापराकरिता निवडणूक विभागाकडून मंजुरी घ्यावी लागते. वाहनावरील खर्च उमेदवाराच्या खात्यात जोडला जातो. 
निवडणुकीशी संबंधित जाणकार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विभागाकडून मंजुरी असलेल्या वाहनावरच उमेदवाराकडून चिन्हाचा उपयोग करता येतो. मात्र, नागपूर शहर व ग्रामीण भागात अनेक वाहनांवर राजकीय पक्षांचे चिन्ह आहेत. राजकीय चिन्ह असलेले वाहन धावत आहे. हा एकप्रकारे राजकीय पक्षांचा प्रचार असल्याचे सांगण्यात येते. विनापरवानगी हा प्रचार असल्याने आचारसंहितेचा भंग असल्याचे बोलले जाते. या वाहनांचा खर्च उमेदवारांच्या खर्चात जोडावा किंवा संबंधितावर आचारसंहिता भंगाची कारवाई होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येते. 
मंजुरी न घेतलेल्या वाहनांवर राजकीय चिन्हांचा वापर होत असेल तर निवडणूक आयोगाच्या फ्लॉइंग स्क्‍वॉडने अशा वाहनांवर कारवाई करावी. जर वाहनाच्या नंबर प्लेटवर राजकीय चिन्ह वापरले असेल किंवा मोटर वाहन कायद्याचा भंग होत असेल तर वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करणार आहेत. 
- चिन्मय पंडित, वाहतूक पोलिस उपायुक्‍त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com