esakal | अरे बापरे! हे सुद्धा करताय ‘फिजिकल डिस्टन्स’ची ‘ऐशीतैशी’
sakal

बोलून बातमी शोधा

patil ceter.jpeg

केंद्र गाव खेड्यात नेमून दिलेल्या ठिकाणी आपली सेवा देतात. मात्र शुक्रवारी खासगी बँकांच्या काही नियम बाह्य ग्राहक सेवा केंद्रांनी रिसोड स्टेट बँक शेजारी ग्राहकाचा एकच गोंधळ माजवला त्यामुळे याठिकाणी सोशल व फिजिकल डिस्टन्स फज्जा उडालेला पहावयास मिळाला.

अरे बापरे! हे सुद्धा करताय ‘फिजिकल डिस्टन्स’ची ‘ऐशीतैशी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड (जि.वाशीम) : येथील स्टेट बँक व खासगी बँकांची ग्राहक सेवा केंद्र दाटीवाटीने आहेत. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने आपल्या ग्राहक सेवा केंद्रांना सेवा देण्याची ठिकाणे नेमून दिली आहेत. तेव्हापासून केंद्र गाव खेड्यात नेमून दिलेल्या ठिकाणी आपली सेवा देतात. मात्र शुक्रवारी खासगी बँकांच्या काही नियम बाह्य ग्राहक सेवा केंद्रांनी रिसोड स्टेट बँक शेजारी ग्राहकाचा एकच गोंधळ माजवला त्यामुळे याठिकाणी सोशल व फिजिकल डिस्टन्स फज्जा उडालेला पहावयास मिळाला. तेव्हा अशा नियमबाह्य ग्राहक सेवा केंद्रावर कारवाई करून प्रतिबंधित करावे, अशी मागणी होत आहे.

आवश्यक वाचा - हृदयद्रावक : घरी जाण्याचा परवाना मिळाल्याने झाला होता आनंद, मात्र घरी पोहोचण्याआधीच क्षणार्धात बदलला दुःखात

याबाबत शासनाच्या जनकल्याण योजना अंतर्गत खात्यातील पाचशे रुपये काढण्यासाठी महिलावर्गाची व ग्राहकांची एकच गर्दी बँकांवर होत आहे. अशा स्थितीत मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातून सीमावर्ती भागातील जयपूर वाढवणा, वटकळी, पानकनेरगाव सेनगाव गोरेगाव पासून नागरिक छुप्या मार्गाने रिसोड येथे येत आहेत. याशिवाय तालुक्यातील ग्राहकांचीही या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. 

अशा स्थितीत कुठलेही अधिकृत परवाना पत्र नसताना स्टेट बँक शेजारी काही खाजगी सेवा केंद्रांनी शुक्रवारी या ठिकाणी आपले सेवा केंद्र सुरू केले. त्यामुळे या केंद्रावर प्रचंड गर्दी रेटारेटी दिसून आली. याबाबत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ही बाब गंभीर असल्याने यामुळे संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तेव्हा अशा नियमबाह्य केंद्रांवर प्रशासनाकडून वेळीच योग्य कारवाई होणे गरजेचे आहे.

सेवा केंद्राची ठिकाणे नेमून दिली : शाखा प्रबंधक
सध्याची परिस्थिती पाहता भारतीय स्टेट बँकेच्या कार्यक्षेत्रा मध्ये जीकाही ग्राहक सेवा केंद्र आहेत त्यांना बँकेकडून ओळखपत्र देऊन आपापल्या नेमून दिलेल्या गावात व परिसरात सेवा देण्यासाठी यापूर्वीच सूचित केले आहे. गरजेनुसार याठिकाणी कार्यालयीन वेळेत लोकेशन नुसार नेमुन दिलेल्या ठिकाणी सेवा केंद्र चालवण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक यांनी दिली.