आदिवासी महिलेचा विनयभंग करून फोटो केले व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

धारणी (जि. अमरावती) : शहरात शुक्रवारी (ता. 28) भरदिवसा एका आदिवासी महिलेला विशिष्ट समाजाच्या युवकाने जबरदस्तीने त्याच्या दुकानात बोलावून तिच्याशी अश्‍लील चाळे केले व तिचा विनयभंग करून त्याचे फोटोसेशन केले तसेच व्हॉट्‌सऍपद्वारे ते फोटो सर्वत्र व्हायरल केले. त्यामुळे आदिवासी संघटनांमध्ये तीव्र रोषाचे वातावरण निर्माण झाले.

शुक्रवारला (ता. 29) सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका 60 वर्षीय आदिवासी महिलेला वसीम आरिफ सौदागर (वय 33, रा. प्रभाग क्रमांक 10 धारणी) याने त्याच्या हार्डवेअरच्या दुकानात बोलविले व त्या महिलेशी अश्‍लील चाळे केले. हा सर्व प्रकार करत असताना वसीमच्या मित्राने त्याचे फोटोसेशन केले व ते शहरातील काही मित्रांच्या मोबाईलवरील व्हॉट्‌सऍपवर व्हायरल केले. हा प्रकार आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती पडताच त्यांनी महिलेला सोबत घेऊन शुक्रवारला (ता. 29) रात्री 10 वाजता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. धारणी पोलिसांनी वसीमविरुद्ध आदिवासी महिलेला जातिवाचक शिवीगाळ, विनयभंग व आयटी ऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मध्यरात्रीच संशयित वसीमची शोधमोहीम सुरू केली. शनिवारला (ता. 29) सकाळी 9 वाजता त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Viral photos of the tribal woman have been molested