मद्यधुंद चालकाचा बेधुंद ट्रॅक्टर, राष्ट्रीय महामार्गावर धुमाकूळ व्हिडिओ व्हायरल . Viral Video Buldhana tractor st mumbai to nagpur road accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Tractor Video Buldhana

Viral Tractor Video : मद्यधुंद चालकाचा बेधुंद ट्रॅक्टर, राष्ट्रीय महामार्गावर धुमाकूळ व्हिडिओ व्हायरल

Viral Tractor Video Buldhana - मुंबई नागपूर महामार्गावर सिंदखेड राजा पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या काळा पाणी ते लभानी देव मंदिर या मार्गाच्या दरम्यान मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, त्यामुळे त्या मध्ये मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाचा पोलीस विभागाने शोध घेऊन कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की तारीख ६ जुन रोजी तालुक्यामधुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या एका कारचालकाने मध्य धुंद ट्रॅक्टर चालकाचा व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद केला असुन तो व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सदर व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर मद्य चालक समोरून येणाऱ्या वाहनांच्या थेट वाहनाच्या जवळ घेवुन जात असल्याचे पाहायला मिळते त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता होती परंतु समोरून येणाऱ्या वाहनांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला वाहने घेऊन ट्रॅक्टर पासून वाहनांचा बचाव करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. ट्रॅक्टरच्या पाठीमागे रोटावेटर असल्यामुळे काही ठिकाणी महामार्गावर रोटावेटर थेट रोडवर आदळल्यांचे पाहायला मिळते.

समोरून येणारे वाहन चालक मुठीत जीव घेऊन वाहन रस्त्याच्या कडेला घेतल्याचे पहायला मिळते.बेधुंद मद्य ट्रॅक्टर चालक हा थेट बसवर ट्रॅक्टर घेऊन जाताना दिसून येतो परंतु एसटी चालकाने प्रसंग अवधान राखत महामार्गाच्या कडेला एसटी बसला घेतल्याचे व्हिडीओ मध्ये दिसुन येत आहे. मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने एसटी बसला धक्का दिला असता तर प्रवाशांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला असता.

परंतु सुदैवाने यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही व एसटी बसचे कोणते नुकसान झाले नाही.ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजी पणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती त्यामुळे मद्य ट्रॅक्टर चालकांचा पोलीस प्रशासनाने शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.

पोलिसांकडून कडक कारवाईची गरज :- राष्ट्रीय महामार्गावर बेधुंद मद्य चालकांने काही किलोमीटर अंतरापर्यंत जाणाऱ्या व येणाऱ्या वाहन चालकांना अडथळा निर्माण करून त्यांच्या जीवित्वास धोका निर्माण केला होता परंतु त्यामध्ये सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही.त्यामुळे ट्रॅक्टर मद्यधुंद चालकांचा सिंदखेड राजा पोलिसांनी शोध घेऊन कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे दररोज या मार्गावरून हजारो वाहने प्रवास करत असतात.मद्य प्राशन करून वाहन चालवणे हा गुन्हा आहे, परंतु अनेक वेळेस दारू पिऊन चालक वाहन चालवत असतो,तेव्हा तो स्वतःसह इतर वाहनामध्ये बसलेले प्रवाशांच्या जीवितवास धोका निर्माण करतो.त्यामुळे पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.