Video : जेवणाची भांडी शौचालयात धुतात, शिवभोजन केंद्रातील किळसवाणा प्रकार

Yavatmal Shivbhojan Thali
Yavatmal Shivbhojan Thalie sakal

यवतमाळ : गरजूंना मोफत अन्न मिळावे यासाठी शिवभोजन थाळी (Shivbhojan) सुरू करण्यात आली. मात्र, शिवभोजन केंद्रावरील भांडी शौचालयात धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव (Mahagaon Yavatmal) येथील शिवभोजन केंद्रावर हे घडलं असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yavatmal Shivbhojan Thali
Video: शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेचा किळसवाना प्रकार...

यवतमाळमधील महागाव हे तालुक्याचे ठिकाण असून इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक महिला शिवभोजन केंद्र चालवत असल्याची माहिती आहे. या केंद्रावरील एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इथं जेवण झाल्यानंतर ती भांडी शौचालयातील पाण्यानं धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे. यामुळे गोरगरीबांच्या आरोग्याचे काय? त्यांच्या आरोग्याचा खेळ मांडलाय का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

शिवभोजन केंद्रावर जेवण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीनं हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी झालेल्या प्रकारामुळे संबंधित केंद्र रद्द करून शासनाने चालकावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

अनेकांना एकवेळचं जेवण मिळत नाही. ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहरात जातात. पण, उत्पन्न् कमी असते आणि भोजनासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. अशा गरजू लोकांसाठी शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी या शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, महागाव येथे सुरू असलेल्या घाणेरड्या प्रकारामुळे शिवभोजन केंदांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com