शिवसेनेने दिलेला शब्द पाळला; सेना अधिक बळकट होईल, कोणी व्यक्त केला हा विश्वास

Vishwas Nandekar said that Shiv Sena will be stronger in Wani Political news
Vishwas Nandekar said that Shiv Sena will be stronger in Wani Political news

यवतमाळ : तेरा वर्षांनंतर झालेली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने लढविली होती. संजय देरकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी दिली आणि उपाध्यक्षपदही देण्यात आले. शिवसेनेने दिलेला शब्द पाळला. वणी विधानसभा मतदारसंघात सेना अधिक बळकट होईल, असा विश्‍वास माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांनी व्यक्त केला.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी दोन वर्षे व तीन वर्षे असा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र, काँग्रेसच्या खासदारांनी केलेल्या वक्तव्याकडे नांदेकरांचे लक्ष वेधले असता, मी बैठकीला उपस्थित होतो. माझे लक्ष बैठकीत होते. खासदारांचे लक्ष नसेल. त्यामुळे ते कोणताही फॉर्म्युला ठरला नाही असे सांगत असावे, असा टोला लगावला.

देरकर यांना पालकमंत्री संजय राठोड यांनी उमेदवारी दिली होती. भगवाशेला त्यांनी खांद्यावर घेतला आहे. लवकरच पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. विधान परिषद निवडणुकीत आपण चतुर्वेदी यांना पाठिंबा दिला होता. मध्यवर्ती निवडणुकीबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेला शब्द पाळला,  से देरकर यांनी स्पष्ट केले.

एक स्वीकृत सदस्यपद शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. काँग्रेसचा प्रतिनिधी शिखर बँकेवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी दिली. यावेळी राजेंद्र गायकवाड, हरिहर लिंगनवार उपस्थित होते.

सामाजिक कार्यात अग्रेसर राहू

सामाजिक कार्यात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आता शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर राहू, अशी ग्वाही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष संजय देरकर यांनी दिली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com