पैनगंगा अभयारण्यात वाघाचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील पैनगंगा अभयारण्याअंतर्गत बिटरगाव वनपरिक्षेत्रातील मसलगावच्या जंगलात अकोली कक्ष क्रमांक 488 मध्ये वाघाचे पहिल्यांदाच दर्शन झाले आहे. वाघ हा वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्याच्या ट्रॅपमध्ये सापडला असून तीन दिवसांपूर्वी सायंकाळी शिकारीच्या शोधात तो होता. याबाबत बिटरगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एच. गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याची पुष्टी केली.

अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर बिबट, रानडुक्कर इत्यादी वन्यप्राणी असून अधून-मधून अभयारण्यात वाघाचे वास्तव्य असल्याची चर्चा होत होती. परंतु त्याला दुजोरा आजपर्यंत मिळाला नव्हता. अभयारण्यात याच वर्षी पहिल्यांदाच विविध "ट्रॅकांग स्पॉट'वर काही दिवसांपूर्वीच कॅमेरे बसविण्यात आले. दरम्यान, सहा तारखेला मसलगा जंगलातील अकोली बीडमधील कक्ष क्रमांक 488 मध्ये सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास या वाघाचे दर्शन झाले. कॅमेऱ्यात वाघाचे अगदी स्पष्ट दर्शन होत असून, हा वाघ पूर्ण वाढ झालेला दिसून येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Visiting the tiger in the Pananganga Sanctuary