जाणून घ्या नागपूर जिल्ह्यात किती झाले मतदान?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

- काटोल : 49 टक्के
- सावनेर : 49 टक्के
- हिंगणा : 47 टक्के
- उमरेड : 55 टक्के
- कामठी : 40 टक्के
- रामटेक : 52 टक्के
नागपूर जिल्ह्यात सरासरी 50 टक्के
- काचुरवाहीमध्ये इव्हीएमची प्रतिकृती जप्त

नागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघातील व नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा विधानसभा मतदारसंघात दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी 50 टक्के मतदान पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. काटोलमध्ये 49 टक्के, सावनेर 49 टक्के, हिंगणा 47 टक्के, उमरेड 55 टक्के, कामठी 40 टक्के व रामटेक मतदारसंघात 52 टक्के मतदान झाले होते. सकाळी मतदान केंद्रावर गर्दी होती. दुपारी मात्र ती ओसरली, सायंकाळी पुन्हा मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात सुमार 65 टक्केपर्यंत मतदान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली असून तेथील मशीन तातडीने बदलण्यात आल्या. काचुरवाहीमध्ये इव्हीएमची प्रतिकृती जप्त करण्यात आली. पारशिवनी तालुक्‍यात दोन ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड झाला. रामटेक तालुक्‍यात एका ठिकाणी नोटाची बटन दबल्यानंतर ती अडकल्याने मशीन बदलावी लागली. कळमेश्‍वर तालुक्‍यात दोन ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड आल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. उर्वरित सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: voting in nagpur district