ईव्हीएमला व्हीव्हीपॅट

File photo
File photo

ईव्हीएमला व्हीव्हीपॅट  
नागपूर : ईव्हीएमवर दर्शविण्यात येत असलेल्या अविश्‍वासनानंतर सर्वोच्च न्यायालयाने यात व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बंगळुरू येथील भारत इलेक्‍ट्रॉनिक लिमिटेड या नवरत्न कंपनीद्वारे पाच हजार 486 व्हीव्हीपॅट जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. याची प्राथमिक तपासणी कळमना मार्केट येथील वेअर हाउसिंग गोडाऊन विंग-सी येथे करण्यात येत आहे. पक्षांच्या प्रतिनिधींनी पाहणीसाठी हजर राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी केले आहे.
जिल्ह्यातील रामटेक व नागपूर या दोन लोकसभा मतदारसंघात चार हजार 382 मतदान केंद्रे निश्‍चित केली आहेत. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून चार हजार 336 बॅलेट युनिट, पाच हजार 486 कंट्रोल युनिट व पाच हजार 486 व्हीव्हीपॅट ही नवीन एम-तीन मतदान यंत्रे प्राप्त झाली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटसह प्रथमच व्हीव्हीपॅट चा वापर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रापैकी बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट ही प्रथमस्तरीय तपासणी 12 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी 26 नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. ही तपासणी भारत इलेक्‍ट्रॉनिक लिमिटेडच्या प्रशिक्षित अभियंत्यांकडून करण्यात येत आहे. प्रथमस्तरीय तपासणीत योग्य आढळून आलेली मतदान यंत्रेच निवडणुकीसाठी वापरण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी सांगितले.
मतदानाची होणार खात्री
व्हीव्हीपॅट हे प्रिंटरप्रमाणे काम करणार आहे. मतदान कक्षामध्ये बॅलेट युनिटसोबत व्हीव्हीपॅट जोडले राहील. मतदार जेव्हा मतदान करतील तेव्हा व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनमध्ये सात सेकंदापर्यंत पेपरस्लीप डिस्प्ले होईल. त्यानंतर पेपरस्लीप व्हीव्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्‍समध्ये जमा होईल. मतदारांना ही स्लीप सोबत नेता येणार नाही. स्लीपमध्ये उमेदवाराचा बॅलेट युनिटवरील अनुक्रमांक, नाव व निवडणूक चिन्ह मुद्रित झाले असेल. अशाप्रकारे व्हीव्हीपॅटमुळे ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याच उमेदवाराला मत पडले आहे याची खात्री मतदार करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com