नरखेड व वाडीत तिघांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

नरखेड/वाडी - कर्जाने बेजार झालेल्या एका युवकाने वाडी येथे तर नरखेडच्या दोन युवकांनी संदिग्ध कारणाने आत्महत्या केल्याच्या तीन घटना मंगळवार व बुधवारी घडल्या.

नरखेड शहरातील इस्माईलपुरा प्रभाग क्र.४ येथील अताउल्ला शेख रहमतुल्ला शेख (वय२८) या तरुणाने घरी साडीने बांधून गळफास लावून आत्महत्या केली. पेठ विभागात मामाकडे शिकत असलेल्या केवल डोमाजी कळंबे (वय १८, रा. अंबाडा) या तरुणाने स्लॅबला दोर बांधून गळफास घेतला.

दोन्ही प्रकरणांतील आत्महत्यांचे कारण कळू शकले नाही. तिसऱ्या घटनेत आठवा मैल, सम्राट अशोकनगर परिसरात बुधवारी दुपारी एका युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पंकज नरेश खोब्रागडे (वय ३४) हा आरटीओ कार्यालयात दलालीचे काम करायचा. परंतु मागील तीन महिन्यांपासून तो सतत आजारी होता. त्याच्यावर अनेकांचे कर्जही असल्याचे बोलले जाते. घटनेच्या वेळी घरी समोरच्या खोलीत त्याची लहान मुलगी टीव्ही पाहत होती. इतर कोणीही घरी नसल्याचे पाहून त्याने आतल्या खोलीतील छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून घेतला. त्याचे वडील आयुधनिर्माणी अंबाझरीतून सेवानिवृत्त झाले आहेत. वाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी गेले व पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागपूरला मेयो रुग्णालयात पाठविला. मृताला पत्नी, आई, वडील व दोन मुली आहेत. पोलिसांनी या तिन्ही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.

Web Title: Wadi Narkhed and three suicide