वाडीत डेंगीने हातपाय पसरले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

रुग्ण आढळल्याने चिंता व खळबळ; आरोग्य विभाग अनभिज्ञ
वाडी - राज्यात डेंगीच्या आजाराने नागरिकांना भयग्रस्त केले असताना वाडी परिसरातही या जीवघेण्या आजाराने पाय पसरायला सुरुवात केली आहे. रविवारी नागरिकांच्या तक्रारीवरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता परिस्थिती लक्षात आली. आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांना योग्य खबरदारीने उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आले. मात्र, वाडी परिसरात जिल्हा आरोग्य विभाग व वाडी नगर परिषदेतर्फे अशी कोणतीही खबरदारी घेतल्याचे दिसून येत नाही. परिणामतः वाडी परिसरात दिवसेंदिवस डेंगी हातपाय पसरत असल्याचे दिसून येते.

रविवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महामार्गावरील आशा हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. एक डेंगीग्रस्त विद्यार्थी, ७ ते ११ वयोगटातील दोन अन्य विद्यार्थी डेंगीसदृश आजाराचे उपचार घेत असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश चालखोर यांनी दिली. इंद्रायणीनगर, शुभारंभ सोसायटी, म्हाडा कॉलनी परिसरातील हे रुग्ण रहिवासी असल्याचे समजते. खडगाव मार्गावरील बालरोगतज्ज्ञ डॉ. भारद्वाज यांच्या दवाखान्यातही तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वेल ट्रीट रुग्णालयात संपर्क केला असता एक रुग्ण आढळला. परंतु, तो नागपूरला उपचार घेत असल्याचे सांगितले. यावरून वाडी परिसरातील अनेक वसाहतीत मोठ्या संख्येने डेंगीचे रुग्ण आहेत, हे सिद्ध होते. शासकीय सुविधा नसल्याने नाइलाजाने खासगी डॉक्‍टरकडे रुग्णांना उपचार घ्यावे लागत असल्याचे पालकांनी सांगितले. 
 
उपाययोजनांचा अभाव
पावसाळ्यापूर्वी प्रचार, पत्रके, डासप्रतिबंध शपथ आदींच्या माध्यमातून जनजागृती केल्याचे वाडी नगर परिषदेने सांगितले. मात्र, वाडी विस्ताराच्या दृष्टीने ही तयारी अपूर्ण असल्याचे चौकशीत दिसून आले. उघडे नाले, त्यावर डास औषधी फवारणी नाही. फॉगिंग मशीन दिसून येत नाही. मग आजार पसरणार नाही तर काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लिचडे यांनी केला. वाडी नगर परिषदेचा आरोग्य विभाग व पदाधिकाऱ्यांना वाडीमध्ये डेंगी पसरला याची माहिती आहे किंवा नाही, हादेखील संशोधनाचा विषय आहे. गत दोन वर्षांपूर्वी डॉ. आंबेडकर नगरात भाग्यश्री खांडेकर या शाळकरी मुलीचा डेंगीने मृत्यू झाला होता.

Web Title: wadi vidarbha news dengue sickness in wadi