जांब प्रकल्प "ओव्हरफ्लो'च्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

काटोल(जि.नागपूर) : तालुक्‍यात मागील वर्षी जाब प्रकल्प निम्म्याच्या खाली भरल्याने यावर्षी चिंता वाढली होती. पण सुरुवातीला पावसाने "खो' दिल्यानंतरही प्रकल्प "ओव्हरफ्लो' झाल्याची चर्चा परिसरात पसरल्याने बघ्यांची शनिवारी दिवसभर गर्दी उसळली होती. तालुका कार्यालय महसूल कार्यालयातून स्थनिक चमूकडून प्राप्त माहितीनुसार प्रकल्प पाणी पातळी स्केलनुसार सकाळी 8 वाजता 89.22 टक्‍के नोंद घेण्यात आली होती. परंतु नदीचा प्रवाह दिवसभर वाहतच असल्याने लेव्हल 92 टक्‍क्‍यांवर गेली असून केवळ आठ टक्‍के जलसाठा "ओव्हरफ्लो'करिता शिल्लक आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवल्यामुळे अतिदक्षतेचा इशारा देऊन जिल्हातील शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केली. पण पावसाने शनिवारी दांडी मारली. पावसाचे वातावरण कायम असून लवकर प्रकल्प "ओव्हरफ्लो' होणार असल्याने तालुक्‍यातील जनतेत आनंदाचे वातावरण दिसून आले. प्रकल्प कोंढाळी-काटोल मार्गावर रिधोरा ग्राम परिसरात येतो. हा मार्ग राज्यमार्ग असल्याने वाहतूक थांबवून बघावयास येत असल्याचे बंदोबस्तावरील पोलिस चमूने सांगितले. पोलिस निरीक्षक आचरेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. "ओव्हरफ्लो' झाल्यास रिधोरा गावाला धोका नसून गावाशेजारी वाहणाऱ्या चंद्रभागा नदीचा 20 ते 25 घरांना धोका असल्याचे तलाठी मारोतकर यांनी सांगीतले. आता केवळ 125 मिमी पाऊस पडल्यास सर्व बॅकलॉग भरून निघेल असा अंदाज आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for the Jamb Project "Overflow"