जयश्रीने पोहोचविले वानखेडे महाविद्यालयाला उपांत्यफेरीत

File photo
File photo

नागपूर : खापरखेडा येथील बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयाने धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवातील महिला व्हॉलीबॉलच्या उपांत्यफेरीत प्रवेश निश्‍चित केला.
वानखेडे महाविद्यालयाने प्रथम सावनेरच्या हरिभाऊ आदमने महाविद्यालयाचा 30-28, 25-7 ने पराभव केला. त्यानंतर कमिन्स कॉलेजवर 25-8, 25-13 ने विजय नोंदविला. आंतरराष्ट्रीय खेळाडू जयश्री ठाकरे व खुशबू मेश्राम विजयाच्या शिल्पकार ठरल्या. अन्य सामन्यात आस्था शर्मा व देवयानी वरठीच्या प्रदर्शनाच्या जोरावर प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने कळमेश्‍वरच्या के. झेड. एस. कॉलेजचा 25-8, 25-21 ने व आदमने महाविद्यालयाने कमिन्स कॉलेजला 25-13, 25-9 ने पराभूत केले. पुरुषांमध्येही प्रियदर्शिनी महाविद्यालयाने व्हीएनआयटीला 25-19, 25-21 ने पराभूत करून बादफेरीकडे वाटचाल केली. अन्य सामन्यात प्रणय वाभिटकर व योगेश रावच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आंबेडकर महाविद्यालयाने कमला नेहरू महाविद्यालयाला 25-11, 25-15 ने व सेंटर पॉइंट स्कूलने इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला 25-18, 25-20 ने पराभूत केले.
कबड्डी स्पर्धेत ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने कमला नेहरू महाविद्यालयाचा 28-3 गुणांनी पराभव करून उपउपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. अन्य सामन्यांमध्ये देवळीच्या एसएसएन महाविद्यालयाने तिडके महाविद्यालयाचा 20-19 गुणांनी, शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने नॅशनल फायर कॉलेजचा 18-7 ने, वायसीसीईने धनवटे महाविद्यालयाचा 32-19 गुणांनी, पंजाबराव देशमुख नाइट कॉलेजने सी. पी. ऍण्ड बेरार महाविद्यालयाचा 44-20 गुणांनी, एम. पी. देव महाविद्यालयाने आंबेडकर महाविद्यालयाचा 25-13 गुणांनी, सिंधू महाविद्यालयाने हिस्लॉप महाविद्यालयाचा 26-24 गुणांनी, रायसोनी महाविद्यालयाने नॅशनल फायर कॉलेजचा 30-7 गुणांनी व आदमने महाविद्यालयाने बॅरि. वानखेडे महाविद्यालयाला 20-14 गुणांनी पराभूत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com