प्रभारी कुलसचिव पदासाठी घमासान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाचा कार्यभार मिळविण्यासाठी उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी दंड थोपटले आहे. शुक्रवारी (ता.21) अनुसूचित जाती आयोगाने त्यांना प्रभारी कुलसचिव पद देण्याचा निर्वाळा दिला. मात्र, प्रभारी कुलसचिवपदाचा कार्यभार नवीन विद्यापीठ कायद्यानुसार देण्यात आल्याने डॉ. नीरज खटी यांच्याकडेच प्रभारी पद राहण्याची शक्‍यता आहे. यामुळे येत्या काही दिवसात प्रभारी कुलसचिव पदावरून विद्यापीठात चांगलेच घमासान होण्याची शक्‍यता आहे.

विद्यापीठ कायदा 2016 मधील कलम 12/5 नुसार रिक्‍त पदाचा प्रभारी कार्यभार देताना, ते संवैधानिक पद असलेल्या अधिकाऱ्यांना देण्याचे नमूद करण्यात आले आहे. यानुसार प्र-कुलगुरू, वित्त व लेखा अधिकारी आणि परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक अशी तीन वैधानिक पदे आहेत. शिवाय त्याचे सर्वाधिकार कुलगुरूंना देण्यात आले आहेत. याशिवाय कार्यभार देताना, कोणत्याही एका पदाचा कार्यभार देता येईल, असे नमूद केले आहे. त्यानुसार परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांकडेच कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी पदभार दिला. मात्र, त्यावरून नाराज उपकुलसचिव डॉ. हिरेखन यांनी अनुसूचित आयोगाकडे धाव घेतली. मात्र, स्वत: उपकुलसचिव असलेले डॉ. अनिल हिरेखण यांच्याकडे आस्थापना आणि मागासवर्गीय कक्षाचा पदभार आहे. त्यामुळे ते पुन्हा दुसरे प्रभारीपद कसे काय मागाताहेत? असा प्रश्‍नही आता विचारला जात आहे.
निर्णय 28 नंतरच
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. काणे विदेशात तर प्रभारी कुलगुरू 28 डिसेंबरपर्यंत सुटीवर आहेत. त्यामुळे यानंतरच या विषयावर अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी अनुसूचित जाती आयोगाच्या निर्णयाची प्रत आली नसून, ती आल्यावर कुलगुरू त्यावर निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: war for the post of secretary in charge