वर्धा जिल्ह्यात दुपारी तीन पर्यंत सरासरी 44 टक्के मतदान

File photo
File photo

वर्धा : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांकरिता सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मतदानाचा उत्साह दिसला, तर काही ठिकाणी संथगतीने मतदानाला सुरुवात झाली. आर्वी मतदारसंघात दुपारी तीनपर्यंत सुमारे 49 टक्के मतदान झाले.
देवळी मतदारसंघात 45 टक्के, हिंगणघाट मतदारसंघात 47 टक्के, तर वर्धा मतदारसंघात 37 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी सुमारे 44 टक्के मतदान झाले. वयोवृद्ध, दिव्यांग मतदारांनीही मतदान प्रक्रियेत हिरिरिणे सहभाग घेतला. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांकरिता सोयीसुविधा उपलब्द्ध करून देण्यात आल्याचे बघायला मिळाले. हिंगणघाट आणि समुद्रपूर येथील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरू न झाल्यामुळे सुरुवातीच्या एका तासातील मतदान प्रभावित झाले. नंतर लगेचच दुसरे मशीन लावण्यात आल्यानंतर मतदानाला सुरळीत सुरुवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com